एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारने विश्‍वासदर्शक ठराव जिंकला

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारने आज विश्‍वासदर्शक ठराव जिंकत विधानसभेत बहुमत सिद्ध केले. शिंदे-फडणवीस सरकारच्‍या बाजूने १६४ सदस्‍यांनी मतदान केले.

शिंदे-फडणवीस सरकारने विश्‍वासदर्शक जिंकला. यामुळे गेली १३ दिवसांहून अधिक काळ चालेल्‍या सत्तासंघर्षाला आता विराम मिळाला आहे.

शिवसेनेच्या ५५ पैकी ३९ आमदारांचे पाठबळ असलेल्या शिंदे गटालाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटनेतेपदावर शिक्‍कामोर्तब केले आहे. शिवसेनेचे अजय चौधरी यांचे गटनेतेपद आणि सुनील प्रभू यांचे मुख्य प्रतोदपदही रद्द ठरवले होते.

शिंदे गटाला शिवसेनेचा विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता देत विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेला धक्‍का दिला होता. या निर्णयामुळे सेनेच्या १६ आमदारांना सोमवारी बहुमत चाचणीवेळी शिंदे गटाचा व्हिप मान्य करून सरकारच्या बाजूने मतदान करावे लागेल. त्यांनी शिंदे गटाच्या विरोधात मतदान केल्यास आदित्य ठाकरे यांच्यासह सेना आमदारांची आमदारकीच धोक्यात येऊ शकते. व्हिपविरोधात मतदान केले म्हणून विधानसभा अध्यक्ष त्यांना निलंबित करू शकतात. अर्थात त्यानंतर शिवसेना सर्वोच्च न्यायालयात धाव घेईल. तसे शिवसेनेने आधीच जाहीर केले होते.