एसटीच्या बसखाली सापडून वृद्धा ठार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


गुहागर : नवानगर येथून गुहागरकडे जाणाऱ्या एसटीच्या बसखाली सापडून वृद्धा ठार झाल्याची दुर्दैवी घटना नवानगर (ता. गुहागर) येथे घडली. मालती विठू राेहिलकर (७०, रा.नवानगर माेहल्ला, गुहागर) असे वृद्धाचे नाव आहे.

याबाबत गुहागर आगारप्रमुख वैभव कांबळे यांनी पाेलिसांना माहिती दिली. चालक चंद्रकांत लक्ष्मण सकपाळ हे गुहागर-वेलदूर (एमएच १४, बीपी २९७०) ही गाडी गुहागर आगारातून सकाळी ९ : ३० वाजता घेऊन निघाले. गाडीत विनय विठ्ठल पवार वाहक म्हणून हाेते. ही बस नवानगर येथून १०:१५ गुहागरकडे येण्यासाठी निघाली.

या गाडीत ३० विद्यार्थी व आठ प्रवासी हाेते. नवानगर बसथांब्यावरून सुटल्यानंतर गाडीच्या चाकाखाली काहीतरी सापडल्याचा चालकाला आवाज आला. चालक चंद्रकांत सकपाळ व वाहक विनय पवार यांनी गाडी थांबवून पाहिले. यावेळी गाडीखाली सापडून वृद्धाचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी तत्काळ गुहागर पाेलिस स्थानकात याबाबत माहिती दिली. पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.