ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजीमहाराज चौकातील पुतळ्याचे सुशोभीकरण व संरक्षण भिंतीचे काम तात्काळ पुर्ण करण्यासाठी शिवप्रेमींची पायीदिंडी


छत्रपती शिवाजीमहाराज चौकातील पुतळ्याचे सुशोभीकरण व संरक्षण भिंतीचे काम तात्काळ पुर्ण करण्यासाठी शिवप्रेमींची पायीदिंडी
___
बीड शहरातील मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज चौकातील पुतळ्याच्या संरक्षक भिंत व सुशोभीकरणाचे काम औरंगाबाद पॅटर्न राबवुन दर्जेदार करण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.०३ फेब्रुवारी शुक्रवार रोजी लिंबागणेश ते शिवतिर्थ (छत्रपती शिवाजीमहाराज चौक)बीड अंदाजे ३० किलोमीटर टाळमृदंगाच्या गजरात पायीदिंडी काढण्यात आली यावेळी ह.भ.प.अनंतकाका मुळे, ह.भ.प.गणपत घोलप,बाजीराव दशमे,राजेभाऊ आप्पा गिरे,रामदास फाळके, पांडुरंग वाणी,विक्की आप्पा वाणी, हरीओम क्षीरसागर, दामु थोरात,मोहन कोटुळे, पिंपरनई सरपंच बाळासाहेब वायभट, विलास काटे,गणेश घाडगे, कृष्णा वायभट आदि. शिवप्रेमी सहभागी होते. निवेदन कार्यालयीन अधिक्षक नगरपरिषद कदम व उपअभियंता नगरपरिषद जाधव यांना देण्यात आले यावेळी रामनाथ खोड,शेख युनुस च-हाटकर, मिलिंद सरपते,बलभीम उबाळे, अड.राज पाटील, आनिल माने पाटील आदि उपस्थित होते.सुशोभीकरणाचे काम दर्जेदार व्हावे
___
छत्रपती शिवाजीमहाराज चौकातील पुतळ्याभोवतीच्या संरक्षक भिंतींचे निकृष्ट काम होत असल्यामुळे
शिवप्रेमींनी बंद पाडले होते तसेच औरंगाबाद पॅटर्न राबवुन दर्जेदार काम करण्याची मागणी मुख्याधिकारी नगरपरिषद बीड नीता अंधारे यांना निवेदनाद्वारे केली होती. बैठक घेऊन लवकरात लवकर काम करण्याचे दिलेले आश्वासन हवेतच जिरल्याचे दिसुन येत असून शिवजन्मोत्सव जवळ आला असून रखडलेले काम दर्जेदार करत तात्काळ पुर्ण करण्यात यावे.

संरक्षक भिंती अभावी अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? नगरपरिषद प्रशासन कि जिल्हाप्रशासन
___
छत्रपती शिवाजीमहाराज चौकातील पुतळ्याभोवतालची संरक्षक भिंत पाडल्यामुळे व सध्या काम रखडलेले असल्याने कुत्रे,जनावरांचा वावर वाढत असुन त्यामुळेच अनुचित प्रकार घडुन कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार कोण नगरपरिषद प्रशासन की जिल्हाप्रशासन? त्यामुळेच बॅरीकेटस लावण्यात येऊन सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा.

पुतळा परिसराचे विद्रुपीकरण व अपघातास कारणीभूत विनापरवाना बॅनर प्रकरणात कारवाई करा
___
छत्रपती शिवाजीमहाराज चौक परीसरात लावलेल्या बॅनरमुळे परीसराचे विद्रुपीकरण होत अपपघाताचे प्रमाण वाढत असुन नगरपरिषदेचा जाहीरात कर बुडवणा-या विनापरवाना बॅनरवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली.

सुशोभीकरणासाठी DPR/BD चे व संरक्षण भिंतीचे काम सुरू :- मुख्याधिकारी नगरपरिषद बीड
____
छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याजवळील सिमेंट रस्त्याची उंची वाढल्यामुळे संरक्षण ग्रीलची उंची कमी झाल्यामुळे मोकाट जनावरे,कुत्री वगैरे पासून धोका होऊ शकतो त्यामुळेच सद्यस्थितीत संरक्षण भिंत तोडून नविन संरक्षण भिंत बीम/ग्रील बसविण्याचे काम सुरू केले आहे. छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी DPR / BD तयार करण्याचे काम सुरू असून सदर DPR शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल व निधी उपलब्धतेनुसार कामे हाती घेण्यात येतील असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी नगरपरिषद बीड नीता अंधारे यांनी दिले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button