ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत…कापूस घरात पडून..त्यामुळे कापसाचे भाव गडगडले!


कापसाचे भाव कमी होण्यामागचे महत्त्वाचे कारणही समोर आले. वास्तविक, कोरोनामुळे भारताने चीनमधून होणाऱ्या निर्यातीवर बंदी घातली होती. चीन हा भारतातील कापूस निर्यात करणारा प्रमुख देश आहे. आता शेतकऱ्यांसमोर असे संकट उभे राहिले आहे,मात्र कापसाची निर्यात न झाल्याने त्याचा वापर होऊ शकला नाही. शेतकऱ्यांना अर्ध्या भावाने कापूस विकावा लागला. या कारणास्तव त्याची किंमतही झपाट्याने घसरली. कापसाच्या भावात एकाच वेळी 2000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घट नोंदवली गेली.

केंद्र सरकारने कापसाची किमान आधारभूत किंमत 6380 रुपये निश्चित केली आहे. या एमएसपीला शेतकरी अपुरे म्हणत आहेत. एवढ्या रकमेवर कापसाचा खर्चही व्यवस्थित वसूल होऊ शकत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकरी कापूस अडवून चालत आहेत. बाजारात कमी कापूस जात असल्याने दरात थोडी सुधारणा झाली असून 7500 ते 8200 रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकला जात आहे. येत्या काही दिवसांत कापसाची मागणी वाढल्यास त्याचे दरही सुधारतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

व्यापाऱ्यांनी कापसाच्या मुहूर्ताचा भाव १४ हजार ते १५ हजार काढला होता. मात्र त्यानंतर आता व्यापाऱ्यांनी कापसाचा भाव झपाट्याने उतरवण्यास सुरवता केली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच व्यापारी आता शेतकऱ्यांकडून तोच कापूस ८ हजार रुपयांपर्यत मागितला जात आहे. शेतकऱ्यांना कापूस लागवडीसाठी लागलेला खर्च, फवारणीचा खर्च काढून शेतकऱ्यांच्या हाती काहीच शिल्लक राहत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

व्यापारी ८ हजार रुपये भावाने शेतकऱ्यांचा कापूस मागत असल्याने तो परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. व्यापारी जो भाव शेतकऱ्यांच्या कापसाला देत आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांचा कापूस लागवडीसाठी लागलेला खर्च सुद्धा निघत नसल्याने पिकवलेला कापूस व्यापाऱ्यांना कसा द्यायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस भरून ठेवलेला आहे. गेल्या चार महिन्यापासून भाव वाढेल, या अपेक्षेने घरातच कापूस पडून आहे त्याची घट देखील होत आहे.

जेव्हा शेतकऱ्यांनी कापूस काढणीला सुरवात केली होती, त्याचवेळी जर कापसाला भाव मिळाला असता तर शेतकऱ्यांनी तात्काळ कापूस विकला असता आणि शेतकऱ्यांना कापूस घरात भरून ठेवण्याची वेळ आली नसती. तसेच शेतकऱ्यांच्या कापसामध्ये घट देखील झाली नसती. परंतु भाव नसल्याने शेतकऱ्यांना कापूस घरात ठेवावा लागत आहे. शासनाने कापसाला हमीभाव दिला तर व्यापारी देखील हमीभावानेच कापूस खरेदी करतील. त्यामुळे भाव कमी जास्त होण्याची वेळच येणार नाही, अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button