हमासने इस्रायली ओलिसांचे मृतदेह पाठवले

Hamas : हमासने गुरुवारी ओलिसांचे मृतदेह असलेल्या चार शवपेट्या इस्रायली सैन्याला सोपवल्या. याते आई आणि तिच्या दोन लहान मुलांचा समावेश आहे. 7 आक्टोबर 2023 रोजी हल्ल्यानंतर हमासने त्यांचे अपहरण केले होते.
यात 9 महिन्यांच्या मुलाचा समावेश होता. अपहरण केलेल्यांमध्ये हा मुलगा सर्वांत लहान होता.ज्या ओलिसांचे मृतदेह इस्रायलला देण्यात आले, त्यात शिरी बिबास, तिची दोन मुले, एरियल बिबास, तिचा पती केफिर बिबास आणि पत्रकार ओडेड लिफशिट्झ यांचा समावेश आहे.
हमासने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात या नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे मृतदेह शवपेटीत सांभाळून ठेवण्यात आले. कायमस्वरूपी युद्धबंदी आणि इस्रायली सैन्याने गाझामधून पूर्णपणे माघार घेतल्यानंतरच उर्वरित ओलिसांची सुटका करण्यात येणार आहे. दरम्यान, 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी संपूर्ण बिबास कुटुंबाचे किबुट्झ निर ओझ येथून अपहरण केले होते. शिरी बिबास यांचे पती यार्देन बिबास यांची मागील आठवड्यात हमासने सुटका केली.
बिबास कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह परत आल्यावर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, यामुळे संपूर्ण इस्रायल शोकाकूल झाले आहे. मृतांमध्ये समावेश असलेल्या ओडेड लिफशिट्झ यांचे अपहरण झाले, तेव्हा ते 83 वर्षांचे होते. ओडेद एक पत्रकार होते आणि पॅलेस्टिनींना अधिकार मिळवून देण्यासाठी लढा देत होते.
इस्रायलमध्ये संतापाची लाट
युद्धबंदी कराराच्या पहिल्या टप्प्यांतर्गत हमासने 24 जिवंत ओलिसांना इस्रायलला सोपविले. तथापि, बिबास कुटुंबाचे मृतदेह हमासने पाठविल्याने इस्रायलमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यामुळे युद्धबंदी कराराच्या दुसऱ्या टप्प्यात अडथळा येण्याची शक्यता आहे. सध्या जवळपास 60 ओलिस हमासच्या ताब्यात असून, यापैकी जवळजवळ निम्म्या नागरिकांचा मृत्यू झाल्याची शंका इस्त्रायली सैन्याला आहे.
युद्धबंदी करारावर प्रश्नचिन्ह
गाझा पट्टीत हमासच्या अतिरेक्यांनी चार शवपेट्या इस्रायली सैन्याच्या स्वाधीन केल्या. त्यानंतर सैन्याचा ताफा शवपेट्या घेऊन इस्रायल येथे परतला असून, मृतदेहाची डीएनए चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयाकडे सोपविले जाईल. दरम्यान, आतापर्यंत इस्राायलच्या 24 ओलिसांची जिवंत सुटका करण्यात आली; मात्र दोन मुले त्यांची आई आणि तिघांचे मृतदेह हमासकडून सोपविण्यात आल्याने युद्धबंदी करार ावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सर्व ओलिसांची करावी अन्यथा…
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आपल्या संबोधनात म्हटले की, शिरी बिबास कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण इस्रायलमध्ये शोककळा पसरली असून, संपूर्ण ओलिसांची सुटका करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. हमासने कराराचे पालन करावे, अऩ्यथा त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल.