ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

कृषी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा आ. भिमराव धोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न


कृषी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



आ. भिमराव धोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न

आष्टी प्रतिनिधी

येथीलकृषी महाविद्यालय, इंजिनीअरिंग कॉलेज (पॉलिटेक्निक कॉलेज), अन्नतंत्र महाविद्यालय (फुड टेक्नॉलॉजी), डि फार्मसी कॉलेज बी फार्मसी कॉलेज, महेश पॅरामेडील कॉलेज, नर्सिंग कॉलेज, महेश आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय,कृषी तंत्रनिकेतन, यांच्या संयुक्त कृषी महाविद्यालयात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी आ.भिमराव धोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपत्र झाले. ध्वजारोहन झाल्यानंतर प्रत्येक कॉलेजच्या दोन ग्रुप विद्यार्थी यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी कृषी महाविद्यालयाच्या शेतकरी या उत्कृष्ट गिताला आ. भीमराव धोंडे यांनी 3 हजार पाचशे रुपये रोख बक्षीस दिले तर बी फार्मसी कॉलेज च्या उत्कृष्ट देश भक्ती पर गीताला प्रशासन अधिकारी डॉ डी बी राऊत , शिवदास विधाते,माऊली बोडखे, दत्तात्रय गिलचे, संजय शेंडे यांनी दोन हजार पाचशे रुपय बक्षीस दिले, तर अन्नतंत्र महाविद्यालयाच्या उत्कृष्ट गिताला उत्तमराव बोडखे, शिवाजी थोरवे, इंजिनिअर पी बी बोडखे यांनी दोन हजार पाचशे रुपये रोख बक्षीस दिले तर शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ व आनंद चॅरिटेबल संस्थेच्या वतीने प्रथम क्रमांक पटकावलेल्या उत्कृष्ट देश भक्ती पर गिताला कृषी महाविद्याल्यास तिन‌ हजार रुपये, द्वितीय अन्नतंत्र महाविद्यालय दोन हजार रुपये,तृतीय डी फार्मसी कॉलेज दिड हजार रुपये, उत्तेजनार्थ बी फार्मसी कॉलेज एक हजार रुपये, उत्तेजनार्थ नर्सिंग कॉलेज एक हजार असे. संस्थेच्या वतीने बक्षीसे देण्यात आली. ध्वजारोहन प्रसंगी, मा.आ. भिमराव धोंडे, डॉ. अजयदादा धोंडे,अभयराजे धोंडे,विठ्ठल बनसोडे, राजेन्द्र धोंडे, उत्तमराव बोडखे, प्रा. नवनाथ अनारशे, प्रशासन अधिकारी डॉ. डी.बी. राऊत, दत्तात्रय गिलचे, शिवदास विधाते, माऊली बोडखे, डि.एस. राऊत, संजय शेंडे, शिवाजी वनवे, पि बी बोडखे, शिवाजी थोरवे , कृषी महाविद्यालय प्राचार्य आरसुळ एस आर, बी फार्मसी व डी फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ सुनील कोल्हे, इंजिनीरिंग चे प्राचार्य संजय बोडखे, अन्नतंत्र कॉलेज चे प्राचार्य साईनाथ मोहळकर, कृषी तंत्रनिकेतनचे प्राचार्य उध्दव घुले , महेश आयुर्वेद महाविद्यालय चे प्राचार्य डॉ चंद्रकांत गोसावी, नर्सिंगचे प्राचार्य व सर्व कॉलेजचे कर्मचारी व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. यावेळी कृषी महाविद्यालय कॉलेज तर्फे ध्वजारोहणा नंतर सर्व विद्यार्थी यांना उत्प आहार देण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मिसाळ एल एस तर प्रास्ताविक व आभार प्राचार्य डॉ आरसूळ एस आर यांनी मानले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button