क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

विद्यार्थ्याला चांगले गुण देण्याचं अमिष दाखवत महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यावर केला बलात्कार


गुरु आणि शिष्याचं नातं हे काही वेगळंच असतं. आई-वडील आपल्या आयुष्याचे साथीदार असता तर गुरु आपल्या संपूर्ण आयुष्याची घडणजडण करत असतात.पण जेव्हा दिशा दाखवणारे हे हात क्रूरकर्म करतात तेव्हा मात्र त्या शिष्याला बसणारा धक्काही तितकाच मोठा असतो. असंच एक प्रकरण समोर आलं आहे जिथे एका महिला शिक्षिकेने (Teacher) आपल्याच 16 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर (Student) बलात्कार (Rape) केला.

अमेरिकेच्या मिसौरी येथे गुरु-शिष्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्याला चांगले गुण देण्याचं अमिष दाखवत एक नाही तर तब्बल दोन वेळा बलात्कार केला. पोलिसांनी या शिक्षिकेला अटक केली आहे.

पोलिसानी 26 वर्षीय शिक्षिका लेना स्टेवार्टविरोधात (Lena Stewart) लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल केले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, लेना स्टेवार्टेने ऑक्टोबर 2022 मध्ये 16 वर्षीय विद्यार्थ्यावर बलात्कार केला.

पोलिसांनी चौकशी केली असता यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. आपली मागणी पूर्ण केलीस तर तुला परीक्षेत चांगले गुण देऊ अशी बतावणी शिक्षिका करत होता. पीडित विद्यार्थ्याने सांगितलं आहे की, यामुळेच वर्गात त्या आपल्याशी फार कडक पद्धतीने वागत नव्हत्या. आपल्याला घरचा अभ्यासही दिला जात नव्हता असं त्याने सांगितलं आहे.

‘डेलीस्टार’च्या वृत्तानुसार, ऑक्टोबर 2022 मध्ये शिक्षिकेने मित्राच्या घरी विद्यार्थ्यावर दोन वेळा बलात्कार केला होता. पहिल्या वेळी विद्यार्थ्याने शिक्षिकेला आपल्याला घरी जाऊ देण्याची विनंती केली होती. दरम्यान दुसऱ्या वेळी शिक्षिकेने पुन्हा एकदा विद्यार्थ्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

प्रकरण समोर आल्यानंतर लेना स्टेवार्टविरोधात कारवाई करण्यात आली आहे. शाळा प्रशासनाने या घटनेची माहिती मिळताच डिसेंबर महिन्यात मोठ्या सुट्टीवर पाठवलं होतं. पोलिसांनी शिक्षिकेला अटक केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button