देश-विदेश
चीनचा रोबोट डॉगने शत्रूचे काम तमाम, व्हिडिओ समोर येताच जगभरात दहशत

चीनचा रोबोट डॉग आणि ड्रोनची फायटींग याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीने न्यूक्लियर, बायोलॉजिकल आणि केमिकल डिफेन्स ड्रिल केली. त्यामध्ये यूएव्ही आणि रोबोटिक डॉगचे प्रदर्शन केले.
चीनच्या रोबोटीक डॉगचे प्रदर्शन मागील वर्षी गोल्डन ड्रैगन 2024 एक्सरसाइजमध्ये करण्यात आले होते. चीन आणि कम्बोडियाने मिळून हे संयुक्त लष्करी सराव 16 ते 30 मे 2024 दरम्यान केले होते. यावेळी चीनी लष्कराने आपली ताकद दाखवली.
तसेच अत्याधुनिक शस्त्र दाखवत आपल्या शक्तीचा परिचय करुन दिला. आता चीन रोबोटीक डॉग पुन्हा चर्चेत आले आहे. मागील महिन्यात चीनने लष्करी सराव केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.