7.1 C
New York
Saturday, December 9, 2023

Buy now

एडिएफसीचा ” अजय ” कोहिनूर हिरा अजय जाधव

spot_img

एडिएफसीचा ” अजय ” कोहिनूर हिरा
अजय जाधव

सपने उन्हीके कामयाब होते है…
जिनके सपनो मे जान होती है…
यूही पंख होने से कुछ नही होता दोस्त…
उडान तो हसलो से होती है.

मित्रांनो आशा प्रकारचा विचार करणारा माणूस हे आपले स्वप्न साकार करण्यासाठी लागणाऱ्या यशाला प्राप्त करतोच. केवळ जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जीवावर हव असणारा स्वप्न साकार करतो.त्याचा एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे एडीएफसी अर्थात अनिल दादा फ्रेंड्स क्रिकेट क्लबचा प्रसन्नपणे हसणारा आणि बोलण्यामध्ये अतिशय आज्ञाधारकता ठेवणारे अजय उर्फ राजू बालाजी जाधव. बीड शहराच्या क्रीडा क्षेत्रातील एक मैलाचा दगड म्हणून एडीएफसी अर्थात अनिल दादा फ्रेंड्स क्रिकेट क्लबचे जे काम आहे ते काम बीडच्या समाजाला उत्साही ठेवण्याचे काम आहे. बीडच्या क्रीडा प्रेमींना महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून निमंत्रित करून क्रिकेटच्या मॅचेस ठेवण्याचे आदर्श काम अनिल दादा जगताप यांच्या मार्गदर्शनामध्ये अजय जाधव आणि संपूर्ण फ्रेंड्स क्रिकेट क्लब करत असते.
आदर्श क्रीडा अकादमी आणि अनिल दादा फ्रेंड्स क्लबच्या वतीने क्रिकेटच्या स्पर्धा घेणाऱ्या अजय जाधवचा हा परिचय. अजय जाधव चा जन्म सर्वसामान्य कुटुंबातआर्थिकदृष्ट्या बिकट परिस्तिथीत उदरनिर्वाह करणाऱ्या परिवारात सौ.कलावती व श्री बालाजी जाधव यांच्या पोटी झाला घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असताना सुद्धा मुलगा शिकला तर आपल्या आयुष्याचे पांग भेटतील या उद्देशाने अजय जाधव ला शाळेत टाकलं. अजय जाधव अभ्यासामध्ये बरा असण्यापेक्षा खेळामध्ये विशेषता क्रिकेटमध्ये एकदम अव्वल होता.जि.प. धोंडीपुरा शाळेमध्ये शालेय शिक्षण चालू असताना त्याच्या अंगातील असणारे क्रीडा गुण हेरून शिक्षकांनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध जिल्हा परिषदेची मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायला सांगितले.गुरुजनाची आज्ञा शिरोधार्य जि.प.मल्टिपर्पज शाळेत प्रवेश घेतला आणि अजय जाधव च्या क्रिकेट गुणांवर संस्कार होऊ लागले.
पुढे अजय जाधवने बलभीम महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेऊन संत गाडगे महाराज क्रिकेट क्लबची स्थापना केली. संत गाडगे महाराज क्रिकेट क्लब मध्ये खेळत असताना शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिलदादा जगतापने अजय जाधव यांना भगवान क्लबला जॉईन होण्यास सांगितले तेव्हा अजय जाधव टेनिस बॉलने क्रिकेट खेळत. आयुष्यातल्या पहिल्या क्रिकेट मॅचची आठवण सांगताना कृतार्थ होऊन अजय जाधव परभणीच्या क्रीडा स्पर्धेमधल्या मॅचची आठवण सांगताना म्हणतात परभणी मध्ये खेळत असताना भगवान क्लबला जिंकण्यासाठी केवळ तेरा धावांची गरज होती आणि फक्त एक वोहर राहिली होती. तेव्हा अजय जाधवने व पार्टनरने पाच बॉल मध्ये दहा धावा तयार केल्या. शेवटचा बॉल टाकत असताना सर्व स्टेडियम निशब्द झाले होते फक्त घोंगावणाऱ्या वाऱ्याचा आवाज येत होता….. अजय जाधव बॅटिंग करत होते बॉलरच्या हातून चेंडू सुटला….तेव्हा अजय जाधव यांना केवळ भगवान क्लबची विजय पताकाच दिसत होती…. आणि अजय जाधव यांनी सरसावून शेवटच्या ओहर मधला शेवटचा बॉल इतक्या जोरात टोलावला की तो बॉल षटकार देऊन गेला….आणि सर्व स्टेडियम मध्ये चैतन्य नाचू लागले…उत्साह गुलाल उधळू लागला…आणि याच स्पर्धेमध्ये अतिशय महत्त्वाची आठवण सांगताना अजय जाधव आपल्या डोळ्यातले अश्रू रोखू शकले नाही या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब अनिलदादा जगताप यांचे छोटे बंधू किशोर जगताप यांना मिळाला होती पण अजय जाधव हा नवीन खेळाडू आहे. त्याला प्रोत्साहन मिळाले पाहिजे म्हणून स्वतःला मिळालेली मॅन ऑफ द मॅच हा किताब विनम्रपणे नाकारून किशोर जगताप यांनी मॅन ऑफ द मॅच हा किताब अजय जाधव यांना द्यायला लावला.
हे सांगत असताना अजय जाधव यांनी मला केलेला प्रश्न हा खरंच निवृत्तीत होता. अजय जाधवने मला विचारलं सर कोण करत का हो एवढं इतरांसाठी जे किशोर जगताप ने केलं ? पुढे महाविद्यालया अंतर्गत होणाऱ्या इंटर कॉलेज क्रिकेट स्पर्धेमध्ये अजय जाधवंनी मिळवलेले नेत्र दीपक कामगिरी ही खेळावर प्रेम करणाऱ्या क्रीडा शिक्षकाच्या लक्षात आल्याशिवाय राहिली नाही.पुढे अजय जाधव डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्फत आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी गुजरात राज्यात बडोद्यात खेळुन अष्टपैलू गुणसंपन्न असणाऱ्या अजय जाधवने जन्मभूमीपासून दूर असणाऱ्या गुजरातमध्ये जी नेत्रदीपक कामगिरी केली ती आकाशातल्या इंद्रधनुष्याप्रमाणे होती.आणि मग क्रिकेटचे हे चैतन्यशिल चळवळ निरंतर पुढे चालत गेली आणि अजय जाधवने क्रिकेटसाठी काही पण विचार निश्चित केला म्हणून गेली पंधरा वर्षापासून एडीएफसी आणि भगवान क्लबच्या वतीने बीडमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा होऊ लागल्या आहेच. एचडीएफसी च्या वतीने 2011 पासून 2015 पर्यंत जिल्हा अंतर्गत क्रीडा स्पर्धा घेतल्या पुढे यश आणि प्रोत्स्नामुळे याच स्पर्धा अंतरराज्य स्तरावर स्पर्धा होऊ लागल्या मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगाव्याशी वाटते अनिल दादा फ्रेंड्स क्लब हा ग्रुप म्हणजे केवळ तात्पुरता क्रीडा ग्रुप नाही तर तो एका भावबंधनात बांधलेले कुटुंब आहे.असं आवर्जून अजय जाधव गर्वाने आणि अभिमानाने म्हणतात एडिएफसी मध्ये समाजातील सर्व क्षेत्रातील सर्व स्तरातील लोक तन-मन-धनाने योगदान देत असतात याचाही आवर्जून उल्लेख अजय जाधव सर्वत्र करत असतात. एडीएफसीला
मिळत असणारे यश हे एडीएफसीच्या 250 सदस्यांच्या संघर्षाचे यश आहे असं अजयजी अतिशय डोळ्यात पाणी आणून सांगतात. एडीएफसी या संस्थेची स्थापना सचिन गायकवाड,शेख अख्तर,राजेश आगाव,रामेश्वर घाडगे, मनोज जोगदंडसह अनेक जणांनी पुढाकार घेतल्यामुळे झाली हे अतिशय विनम्रतेने सांगत असताना अजयच्या डोळ्यांमध्ये असणारा क्रिकेट बद्दलचा भविष्यकाळ स्पष्टपणे दिसू लागतो. कारण एडीएफसी केवळ स्पर्धा घेत नाही तर एडीएफसी आदर्श क्रीडा संघासोबत क्रिकेटची आवड असणाऱ्या लहान मुला-मुलीना,तरुण-तरुनींनाना सुद्धा प्रशिक्षण देते आणि यातूनच अंडर सिक्सटी, अंडर नाईन्टीन, अंडर ट्वेंटी फाईवची मुलं महाराष्ट्राच्या संघामध्ये नेत्रदीपक कामगिरी करत आहेत.यापैकी सचिन धस हा खेळाडू अंडर एटीनचा कॅप्टन आहे.तर ऋषिकेश सोनवणे अंडर ट्वेंटी फाईव महाराष्ट्र राज्य मध्ये खेळतो आहे . युवराज ससाने हा खेळाडू महाराष्ट्राच्या संघामध्ये आपली नेत्रदीपक कामगिरी दाखवली आहे गोपाळ गुरखुदे व समर्थ कदम ही खेळाडू सुद्धा त्यापैकी एक.महिलांच्या बाबतीत जर अजय अतिशय गर्वाने सांगतो की आमच्या संघांमध्ये तयार झालेली कु. मुक्ता मगरे ही महाराष्ट्राच्या संघामध्ये खेळते आहे. मुलींसाठी क्रिकेट खेळण्याचे वातावरण नसताना सुद्धा मुक्ता मरगेला अजय जाधवने दिलेला विश्वास महिला क्रिकेट पटूसाठी ग्राईप वॉटर आहे.
अजय जाधव ला स्वतःबद्दल काही सांगा म्हटल्यानंतर अजय जाधव फक्त खळखळून हसत एवढेच म्हणतो सर मला खेळायला आवडतं आणि समाजात क्रिकेट खेळाचा सक्रिय प्रचार व्हावा वाटतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles