क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

नात्याला काळीमा फासणारी घटना मुला कडून आईला बेदम मारहाण व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल


उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नौतनवा परिसरात एका मुलाने आईला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. लेकाने आईचे केस ओढले.
तिला ओढत रस्त्यावर आणले आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मुलाच्या भयंकर कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कमला देवी या महिलेने आपले शेत दुसऱ्या व्यक्तीला शेती करायला दिले आहे. पीक तयार झाल्यावर ती व्यक्ती आपल्य़ा हिस्साचे पैसे देण्यासाठी घरी आली, मात्र त्य़ावेळी कमला देवी घरात हजर नव्हत्या. त्यामुळे त्या व्यक्तीने कमला देवीच्या मुलाला पैसे दिले आणि आई आल्यावर तिला हे पैसे दे असं सांगितलं. जेव्हा आईला पैसे मुलाकडे दिले आहेत हे समजलं तेव्हा त्यांनी मुलाकडे पैसे मागितले. पण पैसे मागताच मुलगा चिडला आणि त्याने रागाच्या भरात त्याने आईला मारायला सुरुवात केली.

मुलगा आईला बेदम मारत असल्याचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यानंतर आता तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मुलगा आईचे केस ओढतो आणि तिला घरातून बाहेर काढतो, त्यानंतर तिला बेदम मारहाण करतो. याच दरम्यान काही लोक मध्यस्थी करण्यासाठीही येतात, मात्र आरोपी त्यांच्याशीही भांडण करू लागतो. आजूबाजूच्या लोकांनी महिलेला कसेबसे वाचवले. यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

सीओ नौतनवा अनुज सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना 23 नोव्हेंबर रोजी घडली. मुलानेच आईला बेदम मारहाण केली. कमला देवी यांचा मुलगा रितेश वर्मा विरुद्ध कलम 326, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button