छत्रपती संभाजीनगर

चारचाकीच्या शोरूमला भीषण आग


औरंगाबाद जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत असून, वैजापूर शहरातील एका चारचाकीच्या शोरूमला भीषण आग लागली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, आग विझवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले जात आहे.घटनास्थळी वैजापूर पोलीस दाखल झाले असून, नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तर याबाबत अग्निशमन दलाला देखील माहिती देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.दुचाकी शोरूमला आग लागल्याची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. तर शोरूमला लागेलेली आग विझवण्यासाठी उपस्थित नागरिक प्रयत्न करत आहे. विक्रीसाठी शोरूममध्ये नवीन पा-सहा गाड्या ठेवण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयन्त केले जात आहे. मात्र आग एवढी भीषण आहे की, शोरूममधील सर्वच वस्तू जळून खाक झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार शोरूममध्ये ठेवलेल्या ऑईलच्या ड्रमने पेट घेतला आहे. सोबतच आतमध्ये असलेले टायर देखील जळून खाक झाले आहेत.

अग्निशमन दल दाखल…

घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. तर अग्निशमन दलाकडून आता आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र आग भीषण असल्याने आणि आतमधील ऑईलच्या ड्रमने पेट घेतल्याने यासाठी उशीर लागत आहे. सोबतच घटनास्थळी खाजगी पाण्याचे टॅकर बोलवण्यात आले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button