भूकंप,६.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के,४६ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


चीनमध्ये भूकंप झाला असून, ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिणपूर्व भागात ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. भूकंपामुळे अनेक घरांचं नुकसान झालं असून, काही भागातील वीज गायब झाली आहे.

मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, अनेक ठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरु आहे.

अमेरिकेतील भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, सिचुआन प्रांतातील कांगडिंग शहराच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे ४३ किलोमीटर अंतरावर ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. स्थानिकांनी एएफपीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, भूकंपानंतर चेंगडूमधील इमारतींना हादरे बसले. या ठिकाणी अनेक लोक करोना निर्बंधांमुळे घरात बंदिस्त आहेत.

“आम्हाला भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. खालच्या मजल्यावर राहणाऱ्यांना याची जास्त जाणीव झाली. चेंगडू येथे सध्या करोना निर्बंध लागू असल्याने लोकांना आपलं निवासस्थान सोडण्याची परवानगी नाही. यामुळे अनेकांनी कोर्टयार्डमध्ये धाव घेतली होती,” अशी माहिती स्थानिक नागरिकाने दिली आहे.

भूकंपानंतर अनेक ठिकाणी घऱांची पडझड झाली असून, रस्ते वाहतूक बंद झाली आहे. १० हजारांहून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे.