व्हिडिओ न्युज

Video सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला भयानक मृत्यू,ऑटो रिक्षा दुभाजकाला धडकून दोन जण ठार तर तीन जण जखमी


ठाणे : ठाण्याजवळ भिवंडीतून भीषण अपघाताची दुर्दैवी घटना समोर आली आहे. भिवंडीत आज (9 मार्च) सकाळी एका ऑटो रिक्षाचा अपघात झाला आहे. भिवंडीत एका ऑटो रिक्षा दुभाजकाला धडकून दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत.



ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या व्हिडीओमध्ये पाहू शकता की एक बाईकस्वार रस्ता क्रॉस करण्यासाठी जात असताना एक सेकंद थांबला, त्याच वेळी समोरुन भरधाव रिक्षा आली. या रिक्षाचा वेग खूप जास्त असल्याचं दिसत आहे. चालकाचं रिक्षावरील नियंत्रण सुटलं आणि ती थेट डिव्हायडरवर आदळली. एक सेकंदाची घाई केली असती तर दुचाकीस्वाराचाही जीव धोक्यात होता.

हा संपूर्ण व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. या व्हिडीओमध्ये अपघात किती भयंकर आहे ते पाहू शकता. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे भिवंडी परिसरात खळबळ उडाली आहे.

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button