मुकूंद चिरके यांचा वर्वे येथील पाझर तलावात बुडून मृत्यू

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

भोर : तालुक्यातील वर्वेच्या पाझर तलावात पोहताना तलाठ्याचा बुडून मृत्यू झाला. अत्यंत तरबेज, ट्रेकींगसाठी उत्साही असणाऱ्या मुकुंद चिरके यांच्या अशा अपघाती मृत्यूने भोरच्या महसूल विभागासह आसपासच्या गावातही अनेक जण शोकाकुल झाले होते.
भोर तहसीलच्या महसूल विभागात कारकून असलेले कामगार तलाठी मुकूंद चिरके यांचा वर्वे येथील पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. पोहण्यात पटाईत असतानाही त्यांना दम का लागला असावा अशी शंका अनेकांना आला, तेव्हा ते पावसात भिजल्याने दोन दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना सर्दीचा त्रास होता, त्यामुळे त्यांना दम लागला असावा अशी शंका स्थानिकांनी उपस्थित केली आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मुकूंद चिरके हे पोहत असताना त्यांना मध्यभागी गेल्यानंतर दम लागला. त्यांनी मित्रांना मदतीसाठी हाका मारल्या. त्यामुळे मित्रांनी किनाऱ्यावरची नाव वल्हवत नेण्यास सुरवात केली. मात्र तोपर्यंत चिरके पाण्यात बुडाले होते. त्यांच्या मित्रांनी व स्थानिकांनी त्यांना वाचवण्यासाठी धडपड केली. मात्र खोल पाण्यात तलाठ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शोध मोहिमेनंतर मृतदेह मिळाला.