विश्व हिंदू परिषद बॉम्बने हल्ला करण्याची धमकी,संशयित ताब्यात

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील कार्यालयांवर बुधवारी बॉम्बने हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.

बुधवारी एका व्यक्तीने विहिंप कार्यालयात घुसून ही धमकी दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विहिंप कार्यकर्त्यांनी त्याला पकडून दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दिल्लीतील झंडेवालान येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात बुधवारी ही घटना घडली असून खुद्द विहिंपनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.


धमकीनंतर कार्यालयात एकच खळबळ उडाली, त्यामुळे या गोष्टीची तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. त्या दरम्यान या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणातील युवक हा पहिल्यांदा युवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात पोहचला. त्यानंतर तो झंडेवाला येथे असणाऱ्या विहिंपच्या कार्यालयात पोहचला, त्यानंतर तो विहिंपचे प्रदेश महामंत्री सुरेंद्र गुप्ता यांना धमकी देण्यात आली. त्यावेळी तेथील सुरेंद्र गुप्ता यांना तो म्हणाला की, तुमची सर्व कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची आम्हाला सूचना मिळाली आहे, त्यामुळे ही कार्यालये आम्ही बॉम्बने उडवणार आहोत. त्यावेळी त्याला विहिंपच्या कार्यालयात कोंडून ठेवून पोलिसांना बोलवण्यात आले, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्या चौकशीला सुरूवात केली.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही.