क्राईमताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ


बीड : बेपत्ता असलेल्या 19 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या की हत्या या संदर्भात पोलीस तपास करत आहेत.
तालुक्यातील हिरापूर येथील पल्लवी सखाराम चव्हाण ही विवाहित महिला तिन दिवसापासून बेपत्ता झाली होती. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. तिचा शोध घेत असताना जप्ती पारगाव शिवारातील सुनील हिंगेकर यांच्या शेतात विहिरीत एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले.

दरम्यान हा मृतदेह बाहेर काढला असता बेपत्ता असलेल्या 19 वर्षीय पल्लवीचा हा मृतदेह असल्याचे ओळख पटली. या संदर्भात माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्यचे पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरिय तपासणीसाठी पाठवून दिला. मात्र पल्लवी आत्महत्या केली तिचा खून झाला यासंदर्भातला पोलीस तपास करत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button