ताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑनलाईन बैठकीतून शेतकऱ्यांना मिळाला पेरणीसाठी सल्ला


कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर, ता. कळमनुरी जि. हिंगोली अंतर्गत कृषि विज्ञान मंडळाची ऑनलाइन पद्धतीने आढावा बैठक संपन्न झाली. त्यात शेतकऱ्यांना तज्ज्ञांनी मार्गदर्शनक केले. विशेषत: सोयाबीन आणि भाजीपाला लागवड यावर सल्ला देण्यात आला.
तसेच प्रा. अनिल ओळंबे विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) यांनी हळद व केळी पिकांचे व्यवस्थापन, टर्मरिक स्पेशल याचा वापर, फळे व भाजीपाला लागवड तंत्रज्ञान व शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर दिलेल्या मात्रा नुसारच करावा अशी माहिती दिली.



सोयाबीन पेरणीसाठी सल्ला
प्रा. राजेश भालेराव विषय विशेषज्ञ (कृषिविद्या) यांनी सोयाबीन पिकासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या जातीचा शेतकर्‍यांनी अवलंब करावा, सोयाबीन ची पेरणी ही रुंद वराबा सरी पद्धतींनी करून झाडेचे योग्य अंतर ठेवूनच पेरणी करावी व पावसाचा अंदाज घेऊन खत व्यवस्थापन करणे गरजेचं आहे असे त्यांनी सांगितले.

सोयाबीनसाठी बीजप्रक्रिया
त्याचबरोबर प्रा. अजयकुमार सुगावे विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) यांनी सोयाबीन बीजप्रक्रिया हि रासायनिक बुरशीनाशक- रासायनिक कीटकनाशक-जैविक खते व बुरशीनाशक या क्रमाने बीजप्रक्रिया करावी. गोगलगाई या किडीचा सुरवातीला पावसातील खंड, ढगाळ वातावरण, जास्त आद्रता व कमी तापमान असल्या मुळे प्रादुर्भाव वाढतो. तसेच पैसा मिलीपिड्स बहुभक्षी किड सोयाबीन या पिकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून आले होते. त्या करिता एकात्मिक व रसायनिक व्यवस्थापन कृषि विज्ञान केंद्राच्या सल्याने करावे असे आव्हान त्यांनी केले.

खत आणि अन्न व्यवस्थापन
तसेच श्री. साईनाथ खरात विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र)यांनी सोयाबीन व तूर पिकामध्ये एकात्मिक अन्य द्रव्य व्यवस्थापन, शिफारसीनुसार रासायनिक खतमात्रा याचे योग्य नियोजन करावे. सरळ खतामधूनच सोयाबीन पिकाला खत मात्रा आणि जमिनीचा पोत सुधारण्याकरिता अंतर पीक पद्धतीचा अवलंब करावा.

मोबाईल ॲप
तसेच डॉ. अतुल मुराई विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी विकसित केलेल्या मोबाइल ऍप ची महिती दिली. तसेच, डॉ.मुराई यांनी ऑनलाइन पद्धतीने आढावा बैठकीचे आयोजन, सूत्रंसंचालन व आभार प्रदर्शन केले.

भाजीपाला आणि कीड व्यवस्थापन
या बैठकीमध्ये शेतकरी बाधवांनी त्यांचे प्रश्न मांडले श्री. शिवाजीराव गडदे (हत्ता नाईक) यांनी विविध वेल वर्गीय भाजीपाला यांची कधी व कशा पद्धतीने लागवड करावी श्री. राहुल कव्हर (ताकतोडा) यांनी मिरची वरील येणारे किड व त्याचे व्यवस्थापन, सोयाबीन मधील खत व्यवस्थापन, श्री. श्रीराम सवंडकर (टेंभुर्णी) यांनी करवंद लागवड कश्या प्रकारे करावी व श्री. रवी मुंडे (हिवरा) यांनी हळद वरील करपा नियोजन कस कारव. वरील सर्व प्रश्नांचे निरसन संलग्न तज्ज्ञांकडून करण्यात आले.

हा कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र तोंडापुरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. मनीषा मुंगल यांचे मोलाचे योगदान लाभले. या बैठकी मध्ये हत्ता नाईक, टेंभुर्णी, कोठारी, हिवरा, ताकतोडा, पाटोदा, भोसी, खांबाळा व इतर गावातील शेतकरी बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button