क्राईम

दाजीकडून अल्पवयीन मेहुणीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड


‘साली आधी घरवाली होती है’ असे म्हणत एका अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करुन विनयभंग केल्याची घटना वडगाव बुद्रुक येथे घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.



हा प्रकार नोव्हेंबर 2023 ते 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आरोपीच्या घरात घडला.

याबाबत 14 वर्षीय पीडित मुलीच्या आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Raod Police Station) बुधवारी (दि.28) फिर्याद दिली आहे. यावरुन पीडित मुलीचा दाजी सुरेश शामलाल यादव (वय-26 रा. चरवडवस्ती, वडगाव बु., पुणे) याच्यावर आयपीसी 354, 506 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Molestation Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 14 वर्षीय मुलगी आरोपीच्या घरी असताना तिच्या बहिणीच्या
पतीने वेळोवेळी तिच्यासोबत अश्लील चाळे करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला.
डिसेंबर 2023 मध्ये आरोपीने पीडित मुलीसोबत गैरवर्तन केले.

त्यामुळे मुलीने पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपीने तिला मारहाण करुन कोणाला
काही सांगितले तर तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार नाही असे सांगितले. तसेच तुझे आई-वडील व मोठी बहिण गावाला गेल्यानंतर बघून घेतो अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मालुसरे करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button