ताज्या बातम्यामराठा आरक्षणमहत्वाचेमहाराष्ट्र

Video मराठा आरक्षण महिला प्रवासी आणि अंदोलकांमध्ये झटापट ! अरे तुम्हाला मुलं बाळं नाही का? जरांगेंच्या समर्थकांना एक महिला भारी


मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण सुरू आहे. सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आज राज्यभर रास्तारोको करण्याचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं होतं.



त्यानुसार अनेक जिल्ह्यात आज मराठा समाजातील आंदोलकांनी रास्तारोको करत आंदोलन केलं. याचदरम्यान,

 

नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे मराठा आंदोलकांनी रास्ता रोको दरम्यान खाजगी बस अडवली. तेव्हा बस मधील महिला प्रवासी संतप्त झाल्या.

बसमधून उतरून महिलांनी आंदोलकांशी वाद घातला. यावेळी महिला प्रवासी आणि अंदोलकांमध्ये झटापट झाली.

नेमकं काय घडलं? व्हिडिओ पहा !

👇👇👇👇

 

आज राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा समाजाकडून रस्त्यावर उतरत रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी मराठा समाजाने आंदोलन केलं.

हदगावहुन नांदेडकडे एक खाजगी बस येत होती. ही बस मराठा समाजाच्या आंदोलकांनी अडवली. यावेळी मराठा आंदोलकांसोबत महिलांची झटापट झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या खाजगी बसमधील एका महिलेच्या आजारी मुलाला नांदेड येथे रुग्णालयात नेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, मराठा आंदोलकांनी हदगाव तालुक्यातील मनाठा पाटी जवळ रास्त्यात बस अडवली. त्यामुळे महिला संतप्त झाल्या. विनंती करुनही बस जाऊ दिली जात नसल्याने या महिलेसोबत असलेल्या इतर महिला बसच्या खाली उतरल्या, त्यांची आंदोलकांसोबत झटापट झाली.

लातूरमध्ये आंदोलक-पोलीस यांच्यात बाचाबाची
लातूर शहरात ही मराठा आंदोलकांच्या वतीने चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झालीय , आंदोलनादरम्यान अडकलेल्या गाड्या सोडण्यावरून पोलिसांसोबत मराठा आंदोलकांची बाचाबाची झालीय.

तर पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलय . पोलिस अधीक्षक यांची गाडी या चक्का जाम आंदोलनात अडकली होती पोलिसांनी वाहने काढत पोलिस अधीक्षक यांची गाडी बाहेर काढली , तर पोलिस अधीक्षकांनी नागरिकांना अडचण होत असल्यासच सांगत मराठा आंदोलकांना विनंती केली आहे , मात्र आंदोलक आंदोलन करण्यावर ठाम आहेत . ठिय्या मांडत चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे वाहनांच्या लांब लांब रांगा लागलेल्या आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button