लोकल डब्यात चक्क शाल, चादर आणि टॉवेल वाळत घातलेले

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

मुंबईसह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. कितीही पाऊस असला तरी कामानिमित्त लोकांना घराबाहेर पडावे लागते. पावसाळय़ात दैनंदिन जीवनातील सर्वात मोठी समस्या म्हणजे कपडे लवकर न सुकणे.
प्रत्येकालाच या समस्येचा सामना करावा लागतो, परंतु एका मुंबईकराने या समस्येवरही मात करत जबरदस्त जुगाड शोधून काढला आहे. ‘दादर मुंबईकर’ या इन्स्टाग्राम पेजवरील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. ‘हे फक्त आपल्या मुंबईत घडू शकतं, असे भन्नाट कॅप्शन देत शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मुंबई लोकलचा एक डब्बा दिसतोय. या डब्यात कुणीतरी चक्क शाल, चादर आणि टॉवेल सुकत घातलेले दिसत आहे.