पत्नीची गळा चिरून हत्या,शिर घेऊन 12 किमी चालत पोलीस ठाणे गाठले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


ओडिशात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीची गळा चिरून खून केला. एवढेच नाही तर पतीने पत्नीचे छिन्नविछिन्न अवस्थेत शिर घेऊन 12 किमी चालत पोलीस ठाणे गाठले
ओडिशातील धेनकानल येथील चंद्रशेखरपूर येथे नाकाफोडी माझीने पत्नी चंचला हिचा गळा चिरून खून केला. चंचलाला दोन मुलगे होते. त्यापैकी एक विवाहितही आहे. त्याचवेळी ही क्रूर घटना समोर आल्यानंतर चंद्रशेखरपूरमध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पोलिस स्टेशनला जात असताना काही लोकांनी त्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, माझी यांना पत्नीचे अवैध संबंध असल्याचा संशय होता. यावरून दोघांमध्ये बराच वाद झाला होता. यानंतर माळी यांनी चंचलावर धारदार शस्त्राने वार केले. चंचलाच्या हत्येनंतर माझी दुसऱ्या दिवशी सकाळी पत्नीचे छिन्नविछिन्न शिर घेऊन पोलिस ठाण्याच्या दिशेने जाऊ लागला. मात्र, काही लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून माझीला अटक केली. माझीनेही आपला गुन्हा कबूल केला. याशिवाय हत्येसाठी वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.