ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बँक खाते आधारशी जोडण्याची पोस्टात सुविधा


नंदुरबार: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये हप्त्याप्रमाणे प्रतिवर्षी सहा हजार रुपये लाभ देण्यात येतो.
या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील टपाल कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. (PM Kisan Samman Nidhi yojana Facility to link bank account with Aadhaar in post nandurbar news)



या योजनेंतर्गत १४ व्या हप्त्याचा लाभ मे किंवा जूनमध्ये जमा होणार असून, केंद्र सरकारने १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी त्यांचा लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. राज्यात सद्यःस्थितीत १२ लाख ९१ हजार लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात १४ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.

यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड, मोबाईल क्रमांक इत्यादीच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी)मध्ये खाते उघडावे. हे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासांत जोडले जाईल.
ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबीमध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना इतरत्र जाण्याची गरजही पडणार नाही.

पी. एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाती आयपीपीबीमध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थ्यांना संपर्क करून आयपीपीबीमध्ये बँक खाती सुरू करतील.

योजनेच्या १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबीमार्फत १५ मे २०२३ पर्यंत गावपातळीवर सर्वत्र मोहीम राबविण्यात येत आहे. आयपीपीबीमार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषी आयुक्त चव्हाण यांनी केले आहे.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button