ताज्या बातम्या

अभिनव खानदेश राज्यस्तरीय प्रेरणादायी महिला पुरस्कार कौतुकास्पद – महापौर प्रतिभाताई चौधरी


अभिनव खानदेश राज्यस्तरीय प्रेरणादायी महिला पुरस्कार कौतुकास्पद – महापौर प्रतिभाताई चौधरी



धुळे : धुळे शहरातील प्रसिद्ध वृत्तपत्र साप्ताहिक अभिनव खान्देशच्या दिवंगत उपसंपादिका नलिनीताई सुर्यवंशी यांच्या तृतीय स्मृतीप्रीत्यर्थ महाराष्ट्र राज्यातील कर्तबगार
गृहिणींना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मानसोहळा नुकताच धुळे येथे पार पडला.

एका कर्तबगार पुरूषामागे स्रिचा हात असतो, मात्र काही स्त्रिया याला अपवाद आहेत, ज्या आपला प्रपंच, नोकरी व्यवसाय सांभाळून समाजात विशेष अलौकिक कार्य करीत असतात म्हणून उपसंपादिका स्व नलिनी सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राज्यस्तरीय प्रेरणादायी महिला पुरस्कार खूपच कौतुकास्पद!!असे उद्गार महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ धुळे येथील समारंभात पुरस्कार प्रदान करताना काढले.

रविवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेता राज्यातील ९ गुणवंत महिलांना या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार शरद पाटील,ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर, माजी न्यायमूर्ती ॲडव्होकेट जे.टी देसले, डॉ जितेंद्र ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार अनिल चव्हाण, शिर्डीचे विजय थोरात, खानदेशचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रा.सदाशिवराव सूर्यवंशी, निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेम कुमार अहिरे, येवला येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे संपादक ज्येष्ठ कवी प्रशांत वाघ आदी उपस्थित होते. सर्वांना सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी स्व.नलिनीताईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन, वृक्ष पूजन, पुस्तक व संविधान पूजन करण्यात आले. प्रास्ताविक करताना संपादक प्रभाकर सूर्यवंशी म्हणाले की “उत्तम गृहीणीपद भूमिका पार पाडताना पत्नी नलीनीने आपले इतर आवडी,छंद यांना तिलांजली दिल्याचे मनात शल्य होते तसेच सध्या महिलांवरील मणिपूर सारख्या भीषण घटनांमुळे जगाला पुन्हा नारीचे महात्म्य लक्ष्यात आणुन देण्याची गरज आहे हे लक्षात घेवून मी तिच्या स्मरणार्थ अभिनव राज्यस्तरीय खानदेश प्रेरणादायी महिला पुरस्कार २६ जून२०२१ या नलिनी सूर्यवंशीच्या प्रथम स्मृतीदिनापासून सुरू केला. कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव न मागवता, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, व्हॉट्सॲप ग्रुप मधील त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची नोंद घेवून आमचे संपादकीय मंडळ पुरस्कारासाठी निवड करून त्यांना तसे कळवतात. आता पर्यंत २७ साहित्यिक नक्षत्रांचा आम्ही नारी गौरव केला याचे समाधान आहे असे ही सूर्यवंशी म्हणाले

या वेळी कल्पना देशमुख- मुंबई , मायाताई साळुंखे-शिरपूर, डॉ.उमा काळे-पुणे, विद्या रामभाऊ भडके-शेवगाव, तारकाताई विवरेकर-धुळे, सौ सुरेखा वाणी-धुळे यांना महापौर सौ प्रतिभाताई चौधरींच्या व मान्यवरांचा हस्ते सुंदर ट्रॉफी, व सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प असा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मानकरी आपल्या परिवार मित्रमंडळी सह उपस्थित होत्या त्यामुळे या सोहळ्याला भावनिक स्वरूप आले होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन फागण्याच्या सुप्रसिद्ध अहिराणी/मराठी साहित्यिका प्राचार्या रत्नाताई पाटील यांनी काव्यपूर्ण करून सर्वांची पसंती मिळवली. त्यानंतर संपादक प्रभाकर सूर्यवंशी यांनी सर्वांचे आभार मानले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button