ताज्या बातम्या

तलाठी पेपरफुटी प्रकरणात स्पर्धा परीक्षा समन्वय समिती न्यायालयात जाणार; हायकोर्टात करणार ‘ही’ मागणी


मुंबई: सध्या तलाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. तलाठी परीक्षेचे पेपर फुटल्याने एकच गोंधळ निर्माण झालेला होता. या प्रकरणी आता स्पर्धा परीक्षा समन्वय समिती हायकोर्टात जाणार आहे. भरती प्रक्रियेत खंड न पाडता समिती गठीत करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
तलाठी भरती परीक्षेमध्ये हायटेक कॉपी प्रकरण उघडकीस आलेलं होतं. नाशिकमध्ये कॉपी प्रकरण उघड झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील प्रतिक्रिया दिलेली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचे प्रकार आणि उशिरा परीक्षा सुरु झाल्याचे प्रकार घडले होते.



तलाठी परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करावी, या मागणीसठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती उच्च न्यायालयात जाणार आहे. भरती प्रक्रिया सुरु ठेवून चौकशी व्हावी आणि त्याचा अहवाल १० ते १५ दिवसांमध्ये द्यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. याशिवाय एसआटी नेमण्याचीही मागणी याद्वारे करण्यात येणार आहे. ‘एबीपी माझा’ने हे वृत्त दिले आहे.

तलाठी पदासाठीची परीक्षा गुरुवारी (ता. १७) झाली. नाशिकमधील म्हसरूळ केंद्रात हायटेक कॉपी प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी मुख्य संशयित गणेश श्‍यामसिंग गुसिंगे (२८, रा. वैजापूर, जि. संभाजीनगर) यास टॅब, मोबाईल, वॉकीटॉकी व अन्य उपकरणांसह अटक करण्यात आली. त्याचा साथीदार सचिन नायमाने व परीक्ष केंद्रातील संशयित युवती संगीता रामसिंग गुसिंगे (२१) हे दोघे गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले. गुसिंगे याला परीक्षा केंद्राबाहेर पकडण्यात आलं होतं.

तलाठी भरती परीक्षेचा पेपर फोडणारा आरोपीच पास झाला असल्याची माहिती काल समोर आली. आरोपीला परीक्षेमध्ये १३८ गुण मिळाले आहेत. तलाठी पेपर भरती परीक्षेचा फोडल्याप्रकरणी गणेश गुसिंगे हे नाव चर्चेत आलं होतं.

याप्रकरणी आयुक्तांनी तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या पथकाने संशयित गणेश गुसिंगे याच्या मूळ गावी वैजापूरला जाऊन घरझडती घेतली. गणेश गुसिंगे याच्याविरोधात यापूर्वीच म्हाडाचा पेपर व पिंपरी चिंचवड येथील पोलिस भरतीचा पेपर फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र दोन वर्षांपासून तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button