ताज्या बातम्या

आयएनएस वागीर पाणबुडी पहिल्या तैनाती अंतर्गत ऑस्ट्रेलियात फ्रेमंटलमध्ये दाखल


भारतीय नौदलाची आयएनएस वागीर ही पाणबुडी आपल्या पहिल्या तैनातीवर असून जून 2023 मध्ये ही प्रक्रिया सुरु झाली होती. या तैनाती अंतर्गत ती 20 ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलियात फ्रेमंटल येथे दाखल झाले.मुंबईत तयार झालेली कलवरी वर्गातील ‘वागीर’ ही पाचवी पाणबुडी जानेवारी 2023 मध्ये भारतीय नौदलाच्या सेवेत रूजू झाली.



 

ऑस्ट्रेलियामधील आपल्या वास्तव्यकाळात आय एन एस वागीर, ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनार्यावर, रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही (RAN) युनिट्स बरोबर विविध प्रकारच्या सरावांमध्ये सहभागी होईल. याच कालावधीत, 11 ते 21 ऑगस्ट दरम्यान, भारतीय नौदलाची जहाजे आणि विमाने, ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनार्यावर, मलबार 23 या सरावात भाग घेत आहेत तर 22 ते 24 ऑगस्टपर्यंत AUSINDEX 23 या सागरी सरावात भाग घेणार आहेत.

 

सध्या सुरू असलेल्या तैनातीदरम्यान, मूलभूत, मध्यवर्ती आणि प्रगत स्तरावरील पाणबुडीविरोधी सराव नियोजित आहेत. याशिवाय, रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीची पाणबुडी आणि भारतीय नौदलाचे P8i लढाऊ विमान, आयएनएस वागीर बरोबर सराव करणार आहेत. या संयुक्त सरावामुळे भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही मध्ये समन्वय आणि सहकार्य वाढीला लागेल.

 

सध्याची कामगिरी ही भारतीय नौदलाच्या पाणबुड्यांचे सामर्थ्य आणि पोहोच यांचा पुरावा आहे. आयएनएस वागीरची तैनात ही भारतीय नौदलाने ऑस्ट्रेलियात केलेली पहिली तैनात आहे. यातून बेस पोर्टपासून विस्तारित रेंजवर दीर्घकाळापर्यंत परिचालन करण्यातील भारतीय नौदलाची क्षमता आणि व्यावसायिक कौशल्य दिसून येते. तत्पूर्वी तैनातीदरम्यान, आयएनएस वागीरने 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा भाग म्हणून कोलंबोला भेट दिली होती.

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button