ताज्या बातम्या

हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक


अकोला,



येथील हिंगणा परिसरात डोक्यात दगड घालून एकाची हत्या करण्यात आली. या खून प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.न्यू हिंगणा येथील रहिवासी अतुल उर्फ जॅकी श्रीकृष्ण अहीर आणि कळंबेश्वर येथील अभिजित वानखडे असे हे दोन आरोपी आहेत.

या दोघांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता दोन्ही आरोपींना न्यायाधीशांनी पोलिस कोठडी सुनावली आहे. सोनटक्के प्लॉट भागातील रहिवासी शेख शाहरुख शे. हसन याचा हिंगणा फाटा परिसरात गुरुवार 10 ऑगस्ट रोजी दगडाने ठेचून खून करण्यात आला.

या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केल्यावर पोलिसांनी अतुल ऊर्फ जॅकी श्रीकृष्ण अहीर व अभिजित वानखडे या दोघांना अटक केली आहे. murder case ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, शहर पोलिस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, जुने शहराचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनात रवींद्र लांडे, प्रदीप घटे, संतोष मेंढे, शैलेश पाचपोर, छोटू पवार, सागर शिरसाट, आदींनी केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button