ताज्या बातम्या

व्लादिमीर पुतिन यांच्या गर्लफ्रेंडचं अफेअर, कोण आहे तो?


रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या राजकीय कारकीर्दीप्रमाणेच त्यांचं खासगी जीवनही तितकच रहस्यमय आणि वादळी आहे. आता त्यांचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्याचं झालंय असं की, पुतिन यांची कथित प्रेयसी अलिना काबेवा हिच्या अफेअरची चर्चा पाश्चात्य मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरली आहे.
डेली मिररने युक्रेनमधील प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने सांगितले की, पुतिन यांच्या गर्लफ्रेंडचं त्यांच्याच सिक्युरिटी गार्डसोबत अफेअर सुरू आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात गुंतल्याने व्लादिमीर पुतिन यांचं अलिनाकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, चार मुलांसह स्वित्झर्लंडमध्ये राहत असलेली अलिना चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे. अलिना हिच्या या चारही मुलांचे पिता हे व्लादिमीर पुतिन असल्याचं सांगितलं जात आहे.टेलिग्राम चॅन जनरल एसव्हीआरने दावा केला की, पुतिन यांच्या राजवाड्याच्या चार भिंतींमागे सारं काही आलबेल नाही आहे. युक्रेनी मीडिया आउटलेट ओबोजरेवाटेल.एडनुसार पुतिन यांना अलिनाच्या सुरू असलेल्या अफेअरबाबत सांगितलं आहे. मात्र त्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. पुतिन यांना या बातम्यांमध्ये कुठलाही रस नसून, त्यांनी त्यांच्या कथित प्रेयसीचा प्रियकर कोण आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही.

मॉस्कोस्थित एका वृत्तपत्राने पहिल्यांदा २००८ मध्ये दोघांच्या संबंधांबाबत पहिल्यांदा गौप्यस्फोट केला आहे. मात्र व्लादिमीर पुतिन आणि काबेवा या दोघांपैकी एकानेही या नात्याबाबत जाहीरपणे कबुली दिलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून पुतिन आणि काबेवा यांना मॉस्कोमधील राजकीय वर्तुळात अनेकदा पाहिले गेले आहे. त्यामुळे त्यांच्यातील संबंधांना दुजोरा मिळत होता.
काबेवा ही निवृत्त जिमनॅस्ट आहे. तिने दोन ऑलिम्पिक पदके, १४ वर्ल्ड चॅम्पियनशिप पदके आणि २१ यूरोपियन चॅम्पियनशिप पदके पटकावली आहेत. जागतिक जिमनॅस्टिकमधील आघाडीच्या जिमनॅस्टपैकी एक आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button