ताज्या बातम्या

शारीरिक संबंधानंतर अनेक महिलांना नाजूक जागी खूप दुखतं-आग होते? काय सांगतात डॉक्टर?


जोडीदारामधील प्रेमासोबतच शारीरिक संबंध ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. शारीरिक संबंधानंतर होणाऱ्या समस्येबद्दल अनेक महिला आजही दुर्लक्ष करतात. शारीरिक संबंध ठेवणे हे आनंदी गोष्ट असली तरी महिलांसाठी ही त्रासदायक असते.



महिलांना संबंधांनंतर नाजूक जागी म्हणजे योनीच्या ठिकाणी वेदना, जळजळ होते. अनेक वेळा महिलांना योनीतून पांढर पाणीदेखील (white discharge) जातं. कधी कधी या वेदना असह्य असतात. पण शारीरिक संबंधांनंतर या गोष्टी सामान्य असल्याचा महिलांचा समज असतो. (Women health)

पण थांबा ही सामान्य बाब नसून या मागे अनेक कारणं असून हे दुखणं गंभीर आजाराचं लक्षणं असून शक्यता असं स्त्रीरोग सांगतात. शारीरिक संबंधांनंतर महिलांना योनीमार्गात आग होणे, वेदना होणे, पोटत दुखणे, पोट जड वाटणे या समस्या भेडसावतात. यावर आज आपण प्रसिद्ध स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. अलका गोडबोले (Dr. Alka Godbole) या समस्येबद्दलची कारणं आणि उपाय सांगितली आहेत, ते जाणून घेऊयात. (Sexual Health after sex women pain in the sensitive area causes and remedies in marathi )
संमंधीत माहीती झी न्युज ने प्रकाशीत केली आहे !
यामागे काय कारणं असू शकतात!

1 पहिल्यांदा आणि शारीरिक संबंधांच्या सुरुवातीच्या काळात महिलांना नाजूक जागी वेदना आणि जळजळ होते. नाजूक जागी सुरुवात असल्याने त्वचेला इजा होऊन आग आणि वेदना होतात. कालांतराने सरावातून हे दुखणं नाहीस होतं.

2 जर नियमित संबंध असतानाही महिलांना नाजूक जागी म्हणजे योनीमध्ये दुखत असेल, जळजळ होत असेल तर याचा अर्थ तुम्हाला इन्फेक्शनची जंतुसंसर्ग झाल्याची भीती आहे. यामध्ये endometriosis, fibroids सारख्या गाठी, योनिमार्गाचा जंतुसंसर्ग, योनिमार्गात गाठी किंवा पडदा सदृश समस्या, ओटीपोटातील गाठी, गर्भनलिका आणि अन्य भागांवरील सूज या सारख्या समस्या तुम्हाला असू शकतात.

3 या दुखण्यामागे ओटीपोटात ओढ बसल्यासारखे खोल दुखणं endometriosis किवा Pelvic Inflammatory disease म्हणजे आतील अवयवांना सूज असू शकते. यामुळेही तुम्हाला शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आग किंवा जळजळ होऊ शकते.

4 ज्या महिला मेनोपॉज किंवा त्यानंतरच्या वयात असतात त्यांनाही ही समस्या होऊ शकते. त्या दिवसांमध्ये योनिमार्गाचा कोरडेपणा यामुळे ही समस्या होते. अगदी होर्मोन्सच्या बदलांमुळे ही हा त्रास होऊ शकतो.

5 शारीरिक संबंधांच्या वेळेस महिलेला दुखत असेल तर त्यासाठी पुरुषांच्या इंद्रियामध्ये असणारे दोषही एक कारण असू शकतं.

अशावेळी काय करावे!

या सर्वांवर प्राधान्य गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी स्त्री आणि पुरुष दोघांनीही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्याशिवाय समाधानी शारीरिक संबंधासाठी दोन्ही जोडीदारांनी परस्पर संवाद आणि संमतीने हे करणे महत्त्वाचं आहे. लैंगिक संबंधाशी निगडित समस्यांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जाऊन दाखवावे. सगळ्यात महत्त्वाचं शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्या जागीची योग पद्धतीने स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. लोकशाही न्युज24 त्याची पुष्टी करत नाही.)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button