क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड हादरलं! ‘मला तू खूप आवडतेस’ म्हणत तरूणाचे विवाहितेला सतत फोन; नंतर घडलं भयंकर कांड


बीडमध्ये एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणाने सतत फोन करून वीस वर्षीय विवाहितेचा संसार मोडला. नंतर घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे मात्र मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश अजिनाथ राख असे या तरुणांच नाव आहे. याबाबत माहिती अशी की, हा तरुण सतत फोन करून या विवाहितेला त्रास द्यायचा.



यामुळे तिचा संसार देखील मोडला आहे. त्यानंतर तिच्या पतीने तिला माहेरी आणून सोडले. ती आता माहेरीच राहत होती. तिच्या माहेरच्या घरी घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपी तिच्याकडे जात होता.

यावेळी आरोपीने या विवाहितचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिला धमकी देखील दिली. यानंतर तरुणीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. यावरून पोलिसांनी तपास केला.

कासार पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे मात्र बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बीडमध्ये या प्रकरणी चर्चा सुरू आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button