ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुनील केंद्रेकर यांचा व्हीआरएस अर्ज स्वीकारू नये, खंडपीठाचा शासनास आदेश


छत्रपती संभाजीनगर: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा स्वेच्छा निवृत्तीसाठीचा अर्ज शासनाने आज मंजूर केला आहे. धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या केंद्रेकर यांनी अचानक व्हीआरएस घेतल्याने नागरिक तसेच प्रशासनात आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, खंडपीठाने विभागीय आयुक्त केंद्रेकर यांचा अर्ज स्वीकारू नये असा आदेश शासनास दिले आहेत.



विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनाकडे गेल्या महिन्यात व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यानुसार त्यांचा अर्ज आज मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, महत्वाकांशी शहर पाणीपुरवठा योजनेचे नेतृत्व केंद्रेकर करत आहेत. शहर पाणीपुरवठा योजना त्यांच्या नेतृ्वाखाली पूर्ण व्हावी यासाठी कोर्टाने देखील ३० जून २०२३ पर्यंत त्यांची बदली रोखली होती. सध्या ही योजना अंतिम टप्प्यात आये. दरम्यान, त्यांचा व्हीआरएस अर्ज किमान मार्च २०१४ पर्यंत स्वीकारू नये, असे आदेश खंडपीठाने शासनास दिले आहेत.

का घेतली व्हीआरएस?
फेब्रुवारी २०१९ मध्ये ते आयुक्त म्हणून रुजू झाले होते. गेल्या महिन्यात शेतकरी कुटुंब पाहणीअंती त्यांनी दोन हंगामात १० हजार एकरी मदत शेतकऱ्यांना देण्याचं मत व्यक्त केले होते, यावरून सरकार व सनदी अधिकाऱ्यांच्या लॉबीचा त्यांना त्रास झाल्याचे बोलले गेले. दरम्यान त्यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यांचे दोन ते अडीच वर्ष सेवेचे बाकी होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button