मेडिकल कॉलेजसाठी निधी कमी पडू देणार नाही : चंद्रकांत पाटील
सातारा: सातारच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना कॉलेज व हॉस्टेलची एकत्र सुविधा मिळावी, अशी मागणी आ. शिवेंद्रराजेंनी केली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बंद खोल्यांच्या डागडुजीसाठी १ कोटींचा निधी दिला जाईल.तसेच साताऱ्याचे मेडिकल कॉलेज सर्वोत्तम होण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
कृष्णानगर येथील मेडिकल कॉलेजची पाहणी मंत्री चंद्रकांत पाटील, आ. प्रवीण दरेकर यांनी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पाटील यांनी कॉलेजचे काम गतीने व्हावे यासाठी सूचना केल्या. ठेकेदारांनी कोणत्याही परिस्थितीत काम बंद पाडू नये. स्वतःची बांधकामासाठीची गुंतवणूक वाढवावी. शासन योग्य ती मदत करेल. तसेच कॉलेजच्या भंगार चोरीबाबत चौकशी करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, माजी जि.प. सदस्य संदिप शिंदे, खेडच्या सरपंच लता फरांदे, उपसरपंच चंद्रभागा माने, यांच्यासह खेड ग्रामपंचायतीचे सदस्य, भाजप पदाधिकारी उपस्थित होते