ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती


नाशिक:अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आलायाबाबत अधिक माहिती अशी, की उल्हासनगर येथील एका अल्पवयीन मुलाने नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलीवर एक वर्ष अत्याचार केले.
यादरम्यान, सदर पीडित युवती गर्भवती झाली.संशयिताला ही बाब समजताच त्याने तिला गर्भपात करण्याच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. झालेला प्रकार समजताच पीडित युवतीच्या नातेवाईकांनी त्या युवकाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) अधिनियम २१२ चे कलम ४, ६, ८, १२ प्रमाणे अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button