ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शंकर महाराजांच्या सेवेसाठी येणाऱ्या व्यक्तीला मठाबाहेर मारहाण


पुण्यातील सातारा रस्त्यावरील शंकर महाराजांच्या मठात ( Pune) येणाऱ्या एका व्यक्तीला अन्नछत्र निवास मध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने वेताच्या काठीने बेदम मारहाण केली.
सातारा रस्त्यावरील शंकर महाराजांच्या मठाच्या बाहेरच 6 जून रोजी हा प्रकार घडला.



याप्रकरणी गणेश विलास पवार (वय 35, रा. इंदिरा गांधी सोसायटी सहकार नगर पुणे) यांनी तक्रार दिली आहे त्यानुसार मन्या भोंडवे (वय 35, रा. अन्नछत्र निवास धनकवडी पुणे) याच्या विरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर महाराज मठा शेजारी असणाऱ्या ईशान्य बिल्डिंगच्या समोर हा संपूर्ण प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे मित्र गणेश पितळे यांच्यासोबत कामावरून घरी जात होते. ते शंकर महाराज मठाशेजारी आले असताना आरोपीने त्यांना जवळ बोलावून तू अन्नछत्र निवास मध्ये का येतोस असे विचारले. त्यावर फिर्यादीने मी शंकर महाराज यांच्या सेवेसाठी येतो असे सांगितले. त्यानंतर आरोपीने लाकडी वेताच्या काठीने फिर्यादी यांच्या उजव्या गुडघ्यावर मारून फॅक्चर केले. इतकेच नाही तर शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकीही दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू ( Pune) आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button