ताज्या बातम्यानागपूरमहत्वाचेमहाराष्ट्र

वादळाचा तडाख्याने बत्ती गुल, शेकडाे झाडे काेसळली; १५० झाडे पडली, विजेचे पाेलही पडले


नागपूर : बुधवारी झालेल्या जाेरदार वादळवाऱ्याने शहरात अस्ताव्यस्त स्थिती निर्माण झाली. शहरात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा विस्कळीत झाला. पूर्व नागपूरचा परिसर सर्वाधिक प्रभावित झाला. १५० पेक्षा अधिक ठिकाणी झाडे किंवा त्यांच्या फांद्या विद्युत तारांवर उन्मळून पडले. त्यामुळे ७९ विद्युत पाेलची माेडताेड झाली. यातील ७० पाेल पूर्व नागपूरचे तर सर्वरित ९ पाेल बुटीबाेरी परिसरातील आहेत. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला व अनेक भागात बत्ती गुल झाली.



दुपारी ३ वाजताच्या दरम्यान झालेल्या हलक्या पावसासह आलेल्या वादळामुळे गांधीबाग डिव्हीजनअंतर्गत वर्धमाननगर आणि आसपासच्या परिसरातील विद्युत पुरवठा विस्कळीत झाला हाेता. पारडी व सुभाननगर उपविभागाअंतर्गत सीए राेड, कावळापेठ, मुदलियार लेआउट, एचबी टाउन, सतरंजीपुरा, शांतिनगर परिसर सर्वाधिक प्रभावित झाले. जवळपास २० फिडरशी संबंधित परिसरात पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या दाव्यानुसार कर्मचाऱ्यांनी युद्धस्तरावर दुरुस्ती काम करीत सायंकाळी ६ वाजतापर्यंत १८ फिडरचा विद्युत पुरवठा पूर्ववत केला. ७.३० पर्यंत इतर दाेन फिडरचा पुरवठा सुरू करण्यात आला. महापालिका व अग्निशमन विभागाच्या मदतीने पडलेली झाले हटवून दुरुस्ती काम करण्यात आले. यादरम्यान अनेक भागातील वीज पुरवठा बंद असल्याच्या तक्रारी रात्रीपर्यंत येत हाेत्या.

बुट्टीबाेरी भागात अनेक तास अंधार

वादळाचा तडाखा बुट्टीबाेरी परिसरालाही बसला. धानाेली गावात ३, वडगावात ४, शिरूर व कान्हाेली गावात प्रत्येक एक विद्युत पाेल नुकसानग्रस्त झाले. दुरुस्ती कार्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही समस्यांचा सामना करावा लागला.

पश्चिम नागपुरातही पुरवठा खंडित

पश्चिम नागपूरच्या बाेरगावस्थित गाेकुल हाऊसिंग साेसायटी, गाेरेवाडा, गिट्टीखदान, प्रशांत काॅलनी, जाफरनगर आदी परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचा त्रास वाढला हाेता. दरम्यान या परिसरात वीज खंडित हाेण्याची समस्या राेजचीच असल्याचे नागरिकांनी सांगितले. मंगळवारी रात्रीही अनेक वस्त्यांमध्ये अंधार पसरला हाेता. महावितरणच्या अधिकाऱ्यानुसार ट्रकमुळे वीजेचा ताराला नुकसान झाल्याने ही समस्या येत आहे.

मान्सूनपूर्व व्यवस्थापनावर प्रश्न

महावितरणद्वारे काेट्यवधी रुपये खर्च करून एप्रिलपासून मान्सूनपूर्व व्यवस्थापनाचे कार्य केले जाते. यामध्ये वीजेच्या तारांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे मुख्य काम असते. उन्हाळ्यात अनेकदा वीज पुरवठा खंडित करून दुरुस्ती काम केले जात असल्याचा दावा केला जाताे. मात्र बुधवारी ज्याप्रमाणे झाडांच्या फांद्या वीजेच्या तारांवर पडल्या व नुकसानग्रस्त झाल्या, त्यावरून दुरुस्तीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button