ताज्या बातम्या

ग्रामपंचायत कार्यालय मिरकाळा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी


ग्रामपंचायत कार्यालय मिरकाळा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी



बीड जिल्हा प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील मौजे मिरकाळा येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचा पूजन करण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मिरकाळा गावातील भय्यू काम करणाऱ्या महिलांचा सन्मानही करण्यात आला या जयंतीच्या निमित्ताने यशोदा ढाकणे जयश्री सानप सामाजिक कार्यकर्ते व बचत गटात काम करणाऱ्या क्रांती बडे यांचा ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळेस सत्कारमूर्तीने आपले मनोगत व्यक्त केले व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यशोदा ताई ढाकणे जयश्रीताई सानप क्रांती बडे मिरकाळा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक श्री जवरे साहेब वडगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच वारुळे तसेच लक्ष्मण मुंडे अमोल ढाकणे गोवर्धन ढाकणे महेश ढाकणे राजेंद्र ढाकणे योगेश ढाकणे अंगद ढाकणे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी ग्रामसेवक श्री जवरे साहेब यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर अनमोल असे उपस्थित यांना मार्गदर्शन केले व श्री चा सन्मान करावा आदर करावा असे मार्गदर्शन केले यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे व गावकऱ्यांचे आभार मिरकाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button