ताज्या बातम्या

धारूर येथील हजरत मकरज तौकलशह दर्गाह च्या इनामी जमिनीवरील पी. टी.आर सातबारा व फेरफार तात्काळ रद्द करा


धारूर येथील हजरत मकरज तौकलशह दर्गाह च्या इनामी जमिनीवरील पी. टी.आर सातबारा व फेरफार तात्काळ रद्द करा



अन्यथा बेमुदत आमरण उपोषण करू – सय्यद सलीम बापू

वफ्क मिळकतीचे जतन करायचे आहे मात्र प्रशासनातील अधिकारी सदरील कामी कुठलीच ठोस भूमिका घेत नसल्याने इनामी जमिनीचे भिजत धोंगडे राहिले आहेत मग आम्ही न्याय मागायचा कोणाकडे ?

माजलगाव : धारूर येथील हजरत मकरज तौकलशह दर्गाह च्या सर्वे नंबर ३७० मधील इनामी जमिनीवर येथील काही भूमी बेकायदेशीरपणे फेरफार करून पी टी आर व सातबारा मध्ये स्वतःच्या नावाची नोंद करून घेतली असून ती तात्काळ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी माजलगाव येथील माजी नगरसेवक सय्यद सलीम बापू यांनी उपविभागीय अधिकारी माजलगाव यांना निवेदन देऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की, मौजे धारुर (तालुका) येथील सव्र्हे नं.३७० मधील संपूर्ण मिळकत ही मकरज तौकलशाह दर्गाह व तकीया दर्गाह तौकलशाह या दर्गाहची इनामी मिळकत असून या मिळकतीवर मा. जिल्हाधिकारी साहेब बीड यांचे परवानगी शिवाय कोणत्याही प्रकारे खरेदीखत अथवा फेरफार करता येत नाही. परंतू आपले कार्यालयामार्फत तत्कालीन मुख्याधिकारी यांनी वरील सव्र्हेनंबर बाबत आपल्या फेरफार रजिस्टरला, पि.टी.आर ला मालकी रकान्यात तसेच भोगवटदार रकान्यात मा. तहसिलदार साहेब धारूर यांनी ७/१२ ला मालकी रकान्यात अनेक लोकांची बेकायदेशीर नावे घेवून त्यांना वरील मिळकती बाबत पि.टी.आर नकला तसेच घरकुल वाटप केलेले आहे व त्या लोकांनी वरील इनामी मिळकतीवर बेकायदेशीररित्या बांधकाम केलेले आहे. तसेच येथील नामांकीत माजी नगराध्यक्ष व मा नगरसेवक यांनी देखील वरील नोंद पी.टी.आर.ला स्वतःच्या नावे व तसेच आई व भावाच्या नावे घेतली व सदरील नोंदीआधारे बेकायदेशीर टोलेजंग इमारती ही बांधल्या आहेत व घरकुल देखील उचले आहे. वरील इनामी मिळकतीचे फेरफार झाल्यामुळे वरील दर्गाहची सेवा बंद पडलेली आहे व वरील दर्गाहास कोणत्याही प्रकारे सेवा न झाल्यामुळे दर्गाहची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. यापूर्वी निवेदकाने आपल्या कार्यालयासमोर दि.०८/०९/२०२२ रोजी अंदोलन केले होते. या अंदोलनावरून आपण एक समीती निर्माण केली होती व त्या समीती चा कार्यभार रामेश्वर स्वामी नायब तहसिलदार धारूर ( पथक प्रमुख), श्री. नजीर कुरेशी मंडळअधिकारी धारूर (सहायक), श्री. मुळे तलाठी धारूर (सहायक) याची नियुक्ती केली होती परंतु त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही व भुखंड माफियाशी व राजकीय लोकाशी संगणमत करून प्रकरण दाबले आहे. तसेच धारूर येथील प्रभावी मुख्याधीकारी धारूर (महसुल नायब तहसिलदार) तसेच तहसिलदार धारूर यांनी देखील माझी नगरसेवकच्या सांगण्यावरून खोट्या पी.टी. आर. घेतल्या आहेत. तसेच निवेदकाने दि.०४/०७/२०२२ रोजी आपल्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्या आंदलोनाबाबत कोणत्याही प्रकारची नोंद घेण्यात आलेली नाही तसेच कुठल्याही नोंद घेण्यात आलेली नाही.
त्या मुळे मी वरील मिळकतीबाबत आपल्याविरुद्ध मा. दिवाणी न्यायाधिश साहेब व. स्तर माजलगाव यांचे न्यायालयात दिवाणी दावा दाखल करणार आहेत त्याबाबतच्या कलम ८०. सि.पी.सी.च्या नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आपणास या निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, आपण वरील नंबर बाबत दिलेल्या पिटीआरच्या नकला रद्द करण्यात याव्यात तसेच सर्वे सर्व्हेनंबर मध्ये दिलेले घरकुल रद्द करण्यात यावे व वरील मिळकतीवर असलेले बेकायदेशीर बांधकाम ताबडतोब पाडण्यात येवून जायमोक्यावर पंचनामा करून सदरील मिळकत दर्गाहचे तात्काळ ताब्यात देण्यात यावी. अन्यथा दि.०२ जून २०२३ रोजी आपले कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल. ज्यामध्ये काही अनुचित प्रकार झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपले कार्यालयावर राहिल असे येथील माजी नगरसेवक तथा समाजसेवक सय्यद सलीम बापू यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात माजलगाव येथे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button