क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार असल्याचे केले ट्विट, नांदेडमधील एकाला अटक


मुंबई:मुंबई त बॉम्बस्फोट घडवणार असल्याचे ट्विट करणाऱ्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) नांदेड येथून अटक केली. त्याला अटक करून मुंबईत आणण्यात आले.
शहरात गेल्या काही दिवसांपासून बॉम्बस्फोटाच्या अफवेचे निनावी फोन आणि ट्विट मुंबई पोलिसांना येत आहेत. त्या ट्विटनंतर पोलीस तेथे जाऊन तपासणी करतात. तपासणीदरम्यान तो कॉल आणि ट्विट खोटे असल्याचे उघड होते. सोमवारी सकाळी मुंबई पोलिसाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर एक ट्विट आले. आपण मुंबईत लवकरच बॉम्बस्फोट करणार असल्याचे त्याने त्यावर ट्विट केले होते. त्या ट्विटची दखल पोलिसांनी घेतली. बॉम्बस्फोटाचे ट्विट करणाऱ्याची माहिती पोलिसांनी काढली. त्यानंतर पोलिसांचे पथक नांदेड येथे गेले. तेथून श्रीपाद नावाच्या तरुणाला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला अटक करून मुंबईत आणण्यात आले.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button