क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरकाम करणाऱ्या महिलेसोबत अश्लील चाळे आले अंगलट


पुणे: सोसायटीत घरकामासाठी जात असलेल्या महिलेशी बोलण्याचा प्रयत्न करून तिने दुर्लक्ष केले असतानाही अश्लिल चाळे करून विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली.



शेख अबुझर शेह सहजाद (वय २२, रा. बैंगणवाडी, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबात एका ३४ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला घरकाम करते. दरम्यान, नेहमीप्रमाणे त्या येथील सोसायटीत घर कामासाठी जात असताना सोसायटीच्या आवारात शेखने जवळीक साधत बोलण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी त्याने महिलेशी अश्लील चाळे करत त्यांचा विनयभंग केला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button