ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

शिरसगाव येथे 38 वी यशस्वी ऊस परिषद, एफआरपी नकोच! एमआरपी जाहीर करावी बाबत विठ्ठल पवार राजे यांची मागणी..


शिरसगाव येथे 38 वी यशस्वी ऊस परिषद, एफआरपी नकोच! एमआरपी जाहीर करावी बाबत विठ्ठल पवार राजे यांची मागणी..



नेवासा अहमदनगर दिनांक 14 मे 2023.
अहमदनगर नाशिक विभागासह राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हजारो कोटींच्या एफआरपी ला साखर आयुक्तालयाकडून चुना लावण्यात आला असून शेतकऱ्यांच्या एफआरपीतील काट छाटिने भ्रष्टाचाराचा कळस साखर आयुक्तालने गाठलेला आहे. साखर आयुक्ता सह आयुक्तालयाचे बाबू लोकांचेही दिवस भरलेले आहेत असा सणसणाटी आरोप त्यांनी केला आहे. संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी केला आहे ते शिरजगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथे शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे 38 व्या ऊस, कांदा कापूस सोयाबीन दूध केळी चना तृणधान्य कडधान्य, व वीज बिल कर्ज मुक्ती परिषदेत बोलत होते, अध्यक्षस्थानी शिरजगावचे भाऊसाहेब पोटे गुरुजी आणि वरखेडचे सरपंच विनोद ढोकणे होते.
ते म्हणाले आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्य सचिव यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे त्यात मागणी केलेली आहे की कुचकामी साखर आयुक्त सह, साखर, सहकार आयुक्तालयामध्ये दहा-पंधरा वर्षांपासून फेविकॉल लावून बसलेल्या बाबू लोकांसह सहकार मंत्र्यांची उचल बांगडी व एफआरपी तील, आठ हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराविषयी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

राज्यातील ऊस कांदा कापूस सोयाबीन दूध केळी डाळिंब आंबा काजू , कोरडवाहू, अल्पभूधारक शेतकरी कष्टकरी, हे सुलतानी आसमानी संकट, गारपीट मुळे आर्थिक संकटात असताना राज्याचे सहकार, साखर, कृषि, पणन, वस्त्रोद्योग दुग्ध विकास व महसूल मंत्रालया सोबतच साखर आयुक्तालय ही आर्थिक नसेची कुंभकरणाचे निद्रेत आहेत की, झोपीचे सोंग घेतले आहेत, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र राज्य ऊस नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य विठ्ठल पवार राजे यांनी केली आहे. ते शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना संपूर्ण भारत महाराष्ट्र राज्याच्या शिरजगाव येथील 38 व्या ऊस व इतर विषयी परिषद आणि संघटनेच्या 1539 व्या, नेवासा तालुका युवा शेतकरी कष्टकरी कामगार शाखा शिरसगाव, नेवासा जिल्हा अहमदनगर शाखेच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते, ते म्हणाले यापुढे उसाला एफआरपी नको, प्रती टन 5हजार रूपये एमआरपी बेस रेट जाहीर करा, तर साखरेच्या दरात अडीतीस 38/-ते चाळीस 40/-रुपयाची भरीव वाढ करा अशी मागणी विठ्ठल पवार राजे यांनी यावेळी केली..
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी कष्टकरी आसमानी व सुलतानी संकटाचा, ओवळी अति गारपीट, वारा वादळ याने प्रचंड आर्थिक नुकसानीत झालेले असताना राज्य सरकारने जाहीर केलेले अनुदान, पिक विमा, ऊस एफआरपी राज्यात अनेक शेतकऱ्याला मिळालेले नाही.? राज्य सरकार कोर्ट कचेरीचे संकटात असताना, सरकारी बाबूही केवळ कागदी घोडे नाचवत शेतकऱ्यांची नुकसान भरपाई घोषणा व आदेश होऊ नये शेतकऱ्यांचा छळ करत आहेत, राज्यातील सरकारी बाबू लोकांची ही मुजोरगिरी अत्यंत खेदाची आणि निषेधार्य आहे.
राज्यातील साखर आयुक्तालय सहकार, कृषि पणन वस्त्रोद्योग दुग्ध व्यवसाय विकास मंत्रलाय, आयुक्तालय व सहकार मंत्रालय, रिजनल जॉईन डायरेक्टर शुगर नगर नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नागपुर, औरंगाबाद, पुणे या विभागासह, साखर आयुक्तालयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफ आर पी रकमेमध्ये तोडणी वाहतूक व प्रक्रिया प्रचंड खर्चाचा बे हिशोब दाखवत साखर सहकार विभागाने भ्रष्टाचाराची परिसीमा ओलांडलेली असल्या बाबत विठ्ठल पवार राजे यांनी घनघनात करत टीकास्त्र सोडले आहे. अध्यक्षस्थानी शिरसगाव चे ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब पोटे गुरुजी, ग्रामपंचायतचे सरपंच विनोद ढोकणे होते तर ऊस परिषदेला अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंगे पाटील, नगर जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम सर्जे, माजी कुलगुरू अशोकराव ढगे साहेब, ऊस आंदोलनाचे सरसेनापती रावसाहेब ऐतवडे सांगली, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हा प्रमुख अभिजीत पोटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे प्रदेश राज्य कार्यकारणी समितीचे अध्यक्ष अंबादास कोरडे पाटील, नंदू पाटील लोखंडे प्रदेश उपाध्यक्ष, महिला आघाडी प्रदेश संघटक स्वातीताई कदम, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीकांत नलवडे पंढरपूरचे युवक अध्यक्ष महेश बिस्किटे, अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष मेजर सुभाष वाळुंज , नेवासा तालुक्याचे अध्यक्ष पंढरीनाथ कोतकर, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे अध्यक्ष काशिनाथ जाधव पाटील नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष अण्णासाहेब खैरनार, पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब वर्पे राजगुरुनगर तालुक्याचे अध्यक्ष विठ्ठल पाटील लोखंडे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक फाळके, दौलत गंनगे, विठ्ठलराव देशमुख, सुभाष देशमुख, बापु मोरे, संदीप गवारे संघटनेचे जिल्हा कार्यकारणी सदस्य व वरपेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दिलीप वर्पे पाटील,
यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी ऊस, कांदा सहकार शेतकरी आघाडीचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी नेवासा पंचायत समितीचे माजी सदस्य जगन्नाथ कोरडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच संघटनेच्या नेवसा व नगर जिल्हा कार्याध्यक्षपदी उपाध्यक्षपदी कोषाध्यक्षपदी व संघटनेचे सरचिटणीस सचिव उपसचिव पदी संबंधित कार्यकर्त्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या त्यांना त्यावेळी सन्मानित करण्यात आले. संघटनेचे नेवासा तालुका अध्यक्ष पंढरीनाथ खोतकर खुलताबादचे रवींद्र राठोड दादासाहेब नाबदे, माजी कुलगुरू अशोकराव ढगे साहेब , कार्याध्यक्ष देशमुख आदी पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button