ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

पुणे आर. पी. आय आठवले संलग्न रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या महत्वपूर्ण बैठक


२३ मे रोजी पुणे येथे आर. पी. आय आठवले संलग्न रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन



पुणे : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या आदेशानुसार , रविवार दि. २८ / ५ / २०२३ रोजी शिर्डी येथे पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, सदर अधिवेशन यशस्वी करण्याच्या दृष्टीने , रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ सतिश केदारी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. २० / ५ / २०२३ रोजी सकाळी ठीक ११ – ३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का पुणे येथे मिटींगचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस संदीपान साबळे यांनी दिली,

आठवले यांच्या आदेशानुसार शिर्डी येथे गर्दीचा उच्चांक करुन, अधिवेशन यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडची महत्वपूर्ण बठकीचे आयोजन करण्यात आले आहे, या बैठकीत शिर्डी येथील अधिवेशनात मोठ्या संख्येने जाण्याबाबतचे नियोजन ठरविण्यात येणार आहे, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी यांनी सदर कार्यक्रमास हजर राहणे बंधनकारक आहे त्यामुळे सदर बैठकीस राज्य , जिल्हा ,विभागीय व शहर व तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी यांनी सदर बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहनही प्रदेश सरचिटणीस संदीपान साबळे यांनी केले आहे,


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button