ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ परत आणण्याच्या हालचाली सुरू..


मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार इंग्लडमधून परत आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.याआधीही छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार देशात आणण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी न्यूज18 लोकमतला दिली होती. भारतीय वंशाचे ऋषी सुनक काही दिवसांपूर्वीच ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत, त्यामुळे जगदंबा तलवार पुन्हा भारतात आणण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेली जगदंबा तलवार ही देशाची अस्मिता आहे. 

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

ही तलवार कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी 1875 मध्ये तत्कालिन ब्रिटिश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स यांना भेट दिली होती. सध्या ही तलवार ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात आहे. आता ही तलवार परत आणण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

जगदंबा तलवारीची लांबी 121 सेंटिमीटर आहे म्हणजेच ही तलवार जवळपास 4 फूट आहे. तलवारीच्या रत्नजडित मुठीवर संपूर्ण सोन्याचं काम आहे. तलवार दिसायला अत्यंत सुंदर असून वजनाने कमी आहे.
‘शिवाजी महाराज विजया दशमीच्या शस्त्रपुजेच्या दिवशी रत्नजडीत जगदंबा तलवारीची पूजा करायचे. ही तलवार इंग्रज घेऊन गेले आहेत. ऋषी सुनक पंतप्रधान झाले आहेत, ज्यांचा भारताशी संबंध आहे. मी केंद्र सरकारला विनंती केली आहे, तसंच मी सुनक यांच्याशीही संपर्क करणार आहे. आमच्या अस्मितेचं शूरतेचं प्रतिक ही जगदंबा तलवार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने ही तलवार पावन झाली आहे. ही तलवार महाराष्ट्राला परत करावी, असं पत्र आम्ही केंद्राला पाठवलं आहे, तसंच ब्रिटनच्या पंतप्रधानांनाही विनंती करत आहोत,’ असं सुधीर मुनगंटीवार काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button