पीकविमा भरपाईचे ३७२० कोटी रुपये मिळणार; शेकऱ्यांच्या खात्यात ३१२६ कोटी जमा ..

खरिप हंगाम २०२४ मध्ये पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकूण ३ हजार ७२० कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ९ मेपर्यंत ३ हजार १२६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले.
आणखी ३०७ कोटी रुपये शेतकऱ्यांना लगेच मिळणार आहेत. तर २८८ कोटी रुपये राज्याने विम्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहे.
शेतकऱ्यांना सध्या खरिप हंगाम २०२४ मधील वेगवेगळ्या ट्रीगरमधून भरपाई मंजूर करण्याचे काम सुरु आहे. तर राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानिक नैसर्गिक अपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून भरपाई जमा केली जात आहे. काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रोयागावर आधारित नुकसान भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक अपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रोयागावर आधारित नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. या ४ ही ट्रीगरमधून शेतकऱ्यांना ९ एप्रिलपर्यंत ३ हजार ७२० कोटी रुपये भरपाई मंजूर करण्यात आली.
पण राज्याने केवळ पहिला हप्ता दिल्यामुळे नियमानुसार कंपन्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून मंजूर भरपाईच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत आहेत. या दोन ट्रीगरमधून मंजूर भरपाई ३ हजार ४३३ कोटी रुपये आहे. त्यापैकी ९ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ३ हजार १२६ कोटी रुपये जमा करण्यात आले. तर ३०७ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे.
चार जोखीम बाबींमधून मंजूर भरपाई
२७२० कोटी
स्थानिक आपत्ती
७१३ कोटी
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती
२७० कोटी
काढणी पश्चात नुकसान
१८ कोटी
पीक कापणी प्रयोग आधारित
वितरित नुकसान भरपाई
२४१८ कोटी
स्थानिक आपत्ती
७०८ कोटी
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती










