नुकसानग्रस्त पिकांची अनिल कदम यांच्याकडून पाहणी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नुकसानग्रस्त पिकांची अनिल कदम यांच्याकडून पाहणी

निफाड : निफाड तालुक्यातील चांदोरी व सुकेणे परीसरात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांसह इतर शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. चांदोरी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी संजय कोरडे, प्रविण कोरडे यांची दोन एकर द्राक्षबाग अक्षरशः भुईसपाट झाली. या बागेची पाहणी तालुक्याचे मा.आमदार अनिल (आण्णा) कदम यांनी केली.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

यावेळी त्यांच्यासमवेत असलेले निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांना त्यांनी नुकसानग्रस्त सर्वच पिकांची तातडीने पंचनामे करण्याचें निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासमवेत चांदोरी सरपंच विनायक खरात, उपसरपंच संदिप आबा टरले व शेतकरी उपस्थित होते.!