ताज्या बातम्यानाशिकमहत्वाचेमहाराष्ट्रशेत-शिवार

नाशिक जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस,शेतकरी हवालदिल..


नाशिक : विजेच्या गडगडासह नाशिक (Nashik News) जिल्ह्यात गारांचा अवकाळी पाऊस बरसला. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतात काढून ठेवलेले कांदा पीक झाकण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ उडाली. (unseasonal rain nashik with hail nashik news)

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

नाशिक जिल्ह्यात सिन्नर, नांदगाव, नांदूर, खेडलेझुंगे गावात आज संध्याकाळी मेगगर्जनेसह अवकाळी पाऊस बरसला. यात रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले.

चांदवड तालुक्यात आज आठ वाजून वीस मिनिटांनी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. रेडगाव कोलटेक पाटील साळसाने वाहेगाव साळ काजी सांगवी सोनी सांगवी आधी गावांना पावसाने जोडपले जोडपले आहे. काढणीला आलेल्या कांदा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.विंचूर, खेडलेझुंगे, निवाणे गारांसह अवकाळी पाऊस बरसला. कांदा पिकासह मिरची टोमॅटो कलिंगड पिकांचे नुकसान झाले आहे.
नांदगाव तालुक्यात लक्ष्मीनगरला,आझादनगर ला अवकाळी पाऊस बरसला. शेतकरी ग्रामस्थ तुफान पावसामुळे भयभीत झाले आहेत.

सिन्नरच्या पूर्व भागात, देवपूर गावात अवकाळी पाऊस बरसला. मालेगाव औद्यागिक वसाहतीतील शेतात गारांसह पाऊस बरसला. शेतातील कांदा पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिलं झाला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button