नदीपात्रात रिव्हॉल्वर सापडले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे : संगमवाडीतील नदीपात्रात रिव्हाॅल्वर सापडल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणाचा येरवडा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
याबाबतची माहिती येरवडा पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रिव्हाॅल्वर ताब्यात घेतले असून या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. रिव्हाॅल्वर जुने असून देशी बनावटीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोन महिन्यांपूर्वी वारजे भागातील नाल्यात पोलिसांना काडतुसांनी भरलेली पिशवी आणि पिस्तूल सापडले होते. नाल्यात काडतुसांनी भरलेली पिशवी आणि पिस्तूल टाकून दिल्याप्रकरणी वारजे पाेलिसांनी गुन्हा दाखल केला होता.