Video: पुणे,पादचाऱ्याला उडवणाऱ्या बाईकस्वाराचा भयानक अंत

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करू नये, गाड्या चालवताना काळजीपूर्व चालवाव्यात असं वारंवार सांगितलं जातं. पण बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात. ट्रॅफिक रूलचं सर्रास उल्लंघन करतात. हा बाईकस्वारही भरधाव वेगाने गाडी चालवत होता, या वेगानेच त्याचा जीव घेतला आहे.

पुणे : ( आशोक कुंभार ) एका बाईकस्वाराने पादचाऱ्याला उडवलं. त्याच्या पुढच्याच क्षणी बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे. बाईकस्वार तरुणासोबत असं काही घडलं की त्याचा जीव गेला आहे. पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधील ही घटना आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे परिसरात भयंकर अपघात झाला आहे. न्युज लोकमतने यासंमधीचे व्रत प्रसारीत केले आहे

 

अपघाताचं हे दृश्य रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, काही गाड्या रस्त्याने जात आहेत. रस्त्याच्या कडेने काही लोक चालत आहेत. इतक्यात एक भरधाव बाईक येते आणि एका पादचाऱ्याला उडवते.

त्यानंतर जे घडतं ते यापेक्षाही धक्कादायक आहे. पादचाऱ्याला उडवणारा बाईकस्वार पुढे जातो आणि त्याचंही गाडीवरील निंयंत्रण सुटतं, तोसुद्धा बाईकसह खाली कोसळतो. रस्त्याच्या मधोमध पडतो. इतक्यात मागून एक डंपर येतो आणि या बाईकस्वारावरून जातं.

डंपर बाईकस्वाराला चिरडतो. डंपरच्या चाकाखाली आल्याने या बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.