तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करुन लग्नास नकार तरुणीचा पॅरासिटेमॉलच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


वर्धा : ( आशोक कुंभार ) तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करुन लग्नास नकार दिल्याने हताश तरुणीने फिनाईल प्राशन करुन पॅरासिटेमॉलच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या मृत्यूपूर्व बयाणावरुन आरोपीविरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली. आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, २२ वर्षीय पीडितेशी आरोपी अमन प्रकाश कोठारे रा. तेलंगखेडी याने जवळीक निर्माण करुन तिचा विश्वास संपादीत केला. तिला लग्नाचे आमिष देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने आरोपीला लग्नाची गळ घातली असता आरोपी अमन याने लग्नास नकार दिला. ही गोष्ट कानावर पडताच पीडितेच्या पायाखालची वाळूच सरकली तिने हताश होत रागाच्या भरात फिनाईल पिऊन पॅरासिटेमॉलच्या २० गोळ्या व इतर गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पीडितेला तत्काळ हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असून पोलिसांना दिलेल्या मृत्यूपूर्व बयाणात तिने झालेला प्रकार सांगितला. यावरुन हिंगणघाट पोलिसांनी आरोपी अमन कोठारे याच्याविरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे