ताज्या बातम्या

रेल्वेखाली युवक-युवतीची आत्महत्या


अमरावती : अकोल्‍याहून बडनेराच्या दिशेने येणाऱ्या मालगाडीसमोर युवक-युवतीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. मृत तरुणीची ओळख पटली असून युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही. राधा देवीदास पवार (वय २०, रा. कोकर्डा) असे मृत युवतीचे नाव आहे. अकोल्याहून बडनेराकडे मालगाडी येत असताना दुर्गापूर गावानजीक रेल्‍वेखाली युवक-युवतीने आत्‍महत्‍या केल्याची माहिती इंजिनचालकाने रेल्‍वे पोलिसांना दिली. जीआरपी आणि बडनेरा पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता दोघांचे मृतदेह रेल्‍वे रुळाजवळ पडले होते.



तरुणीच्‍या जवळील आधारकार्ड तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांवरून तिचे नाव कळले. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. युवतीचा चुलतभाऊ बडनेरा ठाण्यात पोहोचला आणि त्याने युवतीची ओळख पटविली. रात्री ती घरी होती, परंतु मंगळवारी सकाळी कुठे गेली, याबाबत माहिती नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी युवकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button