ताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्तीसगडमध्ये मान्सून दाखल; अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा


रायपूर : दीर्घकाळ प्रतीक्षेनंतर देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. अशातच छत्तीसगड राज्यातही मान्सूनने एन्ट्री केली असून दक्षिण बस्तरसह संपूर्ण भागात मान्सून प्रभावी झाला आहे.त्यामुळे राज्यातील इतर भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.



मिळालेल्या ताज्या अहवालानुसार, हवामान खात्याने रायगड, कोरबा, जांजगीर चंपा येथे विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेचा इशारा जारी केला आहे. तर बिलासपूर, रायपूर आणि दुर्ग विभागात एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बस्तर, दंतेवाडा, विजापूर भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सुकमामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button