ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस अंमलदाराची चक्क फोन पे वरून वसुली; पोलीस दलात खळबळ


छत्रपती संभाजीनगर : आपले पोलिस दल कर्तव्यदक्ष असते म्हणून सर्वसामान्य सुरक्षित असतात. काही पोलीस अधिकारी, अंमलदार कर्तव्य बजाविण्यात कसलीही कुसर करत नाहीत. ते अगदी इमानदारीने आपले कर्तव्य पार पाडत असतात.
मात्र, बोटावर मोजण्याइतके पोलीस अधिकारी भ्रष्टाचार करतात आणि संपूर्ण पोलीस खात्याचे नाव खराब करतात. एवढेच नाहीतर हे भ्रष्टाचार करणारे पोलीस अधिकारी भ्रष्टाचार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबत असतात. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यात घडला आहे. या प्रकरणात चक्क एका पोलिस कर्मचार्‍याने गुटख्याचा हप्ता म्हणून चक्क फोन पे वर 25 हजार रूपये घेतले आहेत.



काय आहे नेमके प्रकरण?
सचिन भूमे (Police Sachin Dhume) असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरचे पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया (IPS Manish Kalvania) यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. सचिन भूमे हा नागरिकांना धमकावुन त्यांच्याकडून मोठया प्रमाणावर पैशांची वसुली करत असल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांना प्राप्त झाली होती. त्यातच आता पोलिस अंमलदार सचिन भूमे यांनी काही दिवसांपूर्वीच गुटख्याचा हप्ता म्हणून फोन पे वरून 25 हजार रूपये घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना समजली.

यानंतर या प्रकारची चौकशी करून पोलिस अंमलदार सचिन भूमे यांना तात्काळ निलंबीत करण्यात आले. सचिन भूमे हे पैठण उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकात कार्यरत होते.त्यामुळे त्यांचे सर्वच ठिकाणच्या धंद्यांवर लक्ष होते. त्यांनी गुटखा माफियाला कारवाईची धमकी देत त्यांच्याकडून 25 हजार रूपये फोन पेद्वारे घेतले. या प्रकरणाची माहिती समजताच वरिष्ठांनी त्याला निलंबीत केले आहे. या सगळ्या प्रकारामूळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button